
(पार्थ पाटील मानोरा प्रतिनिधी )
मानोरा : तालुक्यातील धामणी येथील श्रवण शिवाजी ठाकरे यांनी केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय यश संपादन केला नवोदय विद्यालय साठी प्रवेश मिळाला आहे. श्रवण्य आपले प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेतून पूर्ण केले असून, सध्या तो एल.एस. पी. एम.हायस्कूलमध्ये इयत्ता पाचवी मध्ये शिक्षण घेत आहे ग्रामीण भागातून शिक्षण घेत असतानाही त्याने केलेल्या या यशस्वी कामगिरीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. आपल्या यशाचे श्रेय त्याने शाळेचे मुख्याध्यापक, तसेच सर्व शिक्षक व आई-वडिलांना दिले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे




Social Plugin