Ticker

6/recent/ticker-posts

वेटणे शाळेची कु. वेदांगी विनोद नलवडे हिचा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या हस्ते सन्मान





बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेटणे, ता.खटाव येथील कुमारी वेदांगी विनोद नलवडे हिने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व्यक्तिमत्व विकास स्पर्धेमध्ये *निबंध स्पर्धेत सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक*  व *हस्ताक्षर स्पर्धेत सातारा जिल्ह्यात द्वितीय क्रमांक* असे दुहेरी यश मिळवल्याबद्दल कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त संपन्न झालेल्या कार्यक्रमामध्ये सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीचे औचित्य साधून दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते.

दरवर्षी प्रमाणे खटाव तालुक्याचे नाव जिल्हास्तरावर वेटणे शाळेने अबाधित ठेवले. यावेळी शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, गटविकासअधिकारी योगेश कदम,गटशिक्षणाधिकारी सोनाली विभूते, शिक्षणविस्तार अधिकारी शिवाजी कदम, केंद्रप्रमुख अजित निकाळजे यांनी विशेष अभिनंदन केले, तिला संग्राम जाधव सर मुख्याध्यापिका कल्पना काटकर व उपशिक्षिका शोभा माळवदकर यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले या यशाबद्दल तिचे  विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर व समस्थ ग्रामस्थ वेटणे यांच्याकडून वेदांगीचे कौतुक होत आहे.