Ticker

6/recent/ticker-posts

बंजारा योद्धा विनोद आडे यांचे मांडवीत आगमन






 लकी राठोड

मांडवी क्रांतीवीर संत सेवालाल महाराज मंदिर, मांडवी येथे 'समाज जोडो' अभियानांतर्गत बंजारा समाजाचे आक्रमक नेतृत्व आणि बंजारा योद्धा विनोद आडे यांचे भव्य आगमन झाले. यावेळी त्यांनी उपस्थित समाज बांधवांशी संवाद साधत, येत्या ८ एप्रिल रोजी मुंबई येथे होणाऱ्या महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे जाहीर आवाहन केले विनोद आडे यांचा संदेश:

"बंजारा समाजाच्या अस्मितेसाठी आणि हक्कासाठी आता घराबाहेर पडण्याची वेळ आली आहे. मांडवीतील प्रत्येक समाज बांधवाने एकजूट दाखवून ८ एप्रिलला मुंबईची वाट धरावी. आपली ताकद दाखवल्याशिवाय शासन आपल्या मागण्यांची दखल घेणार नाही.यावेळी मांडवी परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. "चलो मुंबई" आणि "जय सेवालाल" च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. स्थानिक कार्यकर्त्यांनी या मोर्चासाठी जय्यत तयारी सुरू केली असून, मांडवीतून हजारो बांधव मुंबईला रवाना होणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.