गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत कारंजा तालुक्यात नवीन विहिरी व जनावरांचे गोठे तात्काळ मंजूर मिळावी यासाठी कारंजा तालुक्यातील शेतकरी बांधव सध्या नवीन विहिरीसाठी म्हणजेच याचा फायदा जनावरांच्या निवाऱ्याच्या अभावामुळे अत्यंत गंभीर परिस्थितीत जीवन जगत आहेत जास्त पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती ढासळलेली आहे.
शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत नवीन विहिरींसाठी तरतूद असूनही अनेक पात्र प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत. तसेच पशुसंवर्धन विभागाच्या योजनेतर्गत जनावरांच्या गोठ्यांसाठी अनुदान उपलब्ध असताना त्याबाबतही दुर्लक्ष होत आहे यासाठी शासनाने कोणत्याही प्रकारे तातडीने मंजुरी दिली नाही
सदर बाबीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक व मानसिक तणावाखाली आहेत त्यामुळे आपण या विषयाची तात्काळ दखल घेऊन कारंजा तालुक्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांचे प्रस्ताव त्वरीत मंजूर करून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्याचे आदेश द्यावेत, असे निवेदन जिल्हाधिकारी वाशिम यांना देण्यात आले. याचा पाठपुरावा न झाल्यास शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी लोकशाही मागनि पुढील पावले उचलावी लागतील
असे या निवेदनाव्दारे देण्यात आले त्यावेळी शिवसेना जिल्हा सचिव नागेश भाऊ घोपे, शिवसेना तालुका प्रमुख कारंजा मंगेश पाटील मुंदे, ओबीसी सेल तालुका प्रमुख अमोल पाटील भिंगारे, गणेश धाये आधी शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.





Social Plugin