प्रतिनिधी - गौरव ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जि.प. पूर्व माध्यमिक शाळा, वेणी गणेशपूर येथे विज्ञान विषयाच्या शिक्षकांचा अभाव निर्माण झाल्याने इयत्ता ६ वी व ७ वीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे विज्ञान विषयाच्या शिक्षिका कु. अर्चना गंजीवाले यांची प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांना मूळ पदावर वेणी गणेशपूर येथे कार्यरत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
माहितीनुसार, जि.प. पूर्व माध्यमिक शाळा, वेणी गणेशपूर येथे इयत्ता ६ वी व ७ वीकरिता सध्या केवळ दोन विषय शिक्षक कार्यरत आहेत. त्यामध्ये विज्ञान विषयाचे पद प्रत्यक्षात रिक्त असल्याने विद्यार्थ्यांना नियमित विज्ञान अध्यापन मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, विज्ञान विषयाच्या शिक्षिका असलेल्या कु. अर्चना गंजीवाले यांची प्रतिनियुक्ती पिंपळगाव निपाणी येथे करण्यात आली असल्याची माहिती आहे. त्यामुळे वेणी गणेशपूर येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार पालक व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन कु. अर्चना गंजीवाले यांची प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांना जि.प. पूर्व माध्यमिक शाळा, वेणी गणेशपूर येथे मूळ पदावर कार्यरत करण्याची मागणी संबंधित शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून शिक्षण विभागाने या प्रकरणात लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा पालक व ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.





Social Plugin