प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी
चिखली : बुलडाणा येथे आयोजित विदर्भ स्तरीय सिंगिंग कॉम्पीटीशन मध्ये विजयी ठरलेली उत्कृष्ट गायीका कु . संपदा वसंतराव गाडेकर हिला सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या हस्ते विदर्भ टॅलेंट अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले .
याबाबत असे की , विदर्भातील AKR2 & NP Group यांच्या तर्फे बुलडाणा येथे विदर्भ स्तरीय सिंगिंग कॉम्पीटीशन सह अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते .आराध्या लॉन्स मधील सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या गायन स्पर्धेमध्ये विदर्भातील अनेक गायक कलावंतांनी सहभाग घेऊन सादरीकरण केले .
यामध्ये बुलडाणा जिल्हा शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष तथा प्राचार्य वसंतराव गाडेकर यांची सुकन्या गायीका कु . संपदा गाडेकर हिने स्पर्धेत सहभागी होऊन उत्कृष्ट गायन करीत स्पर्धेचे परीक्षक , मान्यवर व उपस्थितांना मंत्रमुग्ध करून विदर्भ टॅलेंट अवॉर्ड पटकाविला त्याबद्दल या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या हस्ते तिला विदर्भ टॅलेंट अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले .
यावेळी ब्रँड ओनर डॉ . अक्सा , नगरसेविका डॉ . मिनलताई गावंडे , सौ .मनिषाताई कोकाटे , सौ . कविता निशाणे , सौ .अपर्णा अंबरकर , सौ . रुपाली नागपुरे , सौ .रचना सोनोने, सौ . निकीता जाधव , सौ . पुनम खरात ह्या प्रामुख्याने उपस्थित होत्या .





Social Plugin