प्रतिनिधी - गौरव ब्राम्हणवाडे नांदगाव खंडेश्वर :
“जाब विचारताच सत्ताधाऱ्यांना आठवले शिवराय; ४:१५ ला घाईघाईत पूजन”
नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची सत्ता असतानाही छत्रपती शिवाजी महाराज जयंतीकडे उघडपणे दुर्लक्ष झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी ३:३० वाजेपर्यंतही नगरपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे साधे पूजनसुद्धा करण्यात आले नव्हते.
ही बाब लक्षात येताच अविनाश भाऊ ब्राह्मणवाडे यांनी नगरपंचायत प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना थेट जाब विचारला.यानंतर अविनाश भाऊ ब्राह्मणवाडे यांनी स्वतः पुढाकार घेत सुमारे ३:३० वाजता नगरपंचायत कार्यालयात जाऊन शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन केले.जाब विचारल्यानंतरच प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना शिवरायांची आठवण झाली आणि त्यानंतर सुमारे ४:१५ वाजता घाईघाईत पुन्हा पूजन करण्यात आले, अशी माहिती समोर आली आहे.
सार्वजनिक ठिकाणी मोठमोठे बॅनर-फ्लेक्स लावून आणि भाषणांमध्ये शिवरायांचे नाव घेऊन राजकारण करणारे सत्ताधारी, प्रत्यक्षात मात्र नगरपंचायत कार्यालयात शिवजयंतीसारख्या अभिमानाच्या दिवसालाच विसरले, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.नगराध्यक्ष पदही शिवसेनेकडे असताना नगरपंचायत कार्यालयात शिवजयंती वेळेत साजरी न होणे ही नांदगाव खंडेश्वरसाठी अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.आता नागरिकांमधून थेट प्रश्न विचारला जात आहे .
“शिवरायांचे नाव फक्त राजकीय फायद्यासाठीच वापरायचे का? आणि त्यांच्या जयंतीलाच विसरायचे का?”
या प्रकरणी नगराध्यक्ष व नगरपंचायत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.





Social Plugin