पालघर प्रतिनिधी : धनेश क्षिरसागर
१२ मार्च २०२६
भैय्या पाडा येथील सर्वे क्रमांक १६७/१७ या सरकारी जागेवरील अनधिकृत बांधकाम प्रकरणी महसूल विभागाने घेतली दखल; नागरिकांना भविष्यात नुकसान टाळण्यासाठी बेकायदेशीर बांधकाम न करण्याचा इशारा.
बोईसर परिसरातील भैय्या पाडा येथील सर्वे क्रमांक १६७/१७ या सरकारी जागेवर करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत महसूल विभागाने दखल घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या जागेवर चंदा देवेंद्र पांडे यांनी बांधकाम केल्याची बाब समोर आल्यानंतर बोईसर मंडळ अधिकारी विजय गुंडकर यांनी कारवाई केली आहे.
मंडळ अधिकारी विजय गुंडकर यांनी संबंधित ठिकाणी नागरिकांना सरकारी जागेवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये असा स्पष्ट इशारा दिला आहे.
जर कोणीही सरकारी जागेवर बेकायदेशीर बांधकाम केले तर भविष्यात ते तोडण्यात येऊ शकते व संबंधित व्यक्तींना आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते, असेही त्यांनी नागरिकांना सांगितले.
तसेच महसूल विभागाच्या नियमांनुसार सरकारी जागेवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करणे बेकायदेशीर असल्याचे सांगत नागरिकांनी अशा प्रकारच्या कृतीपासून दूर राहावे, असे आवाहनही मंडळ अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर मंडळ अधिकाऱ्यांनी परिसरातील नागरिकांना आवाहन केले की, कोणीही सरकारी जागेवर अतिक्रमण किंवा बांधकाम करू नये. अशा प्रकारचे प्रकार आढळल्यास महसूल विभागाकडून तात्काळ कारवाई करण्यात येईल.
दरम्यान, सरकारी जागांचे संरक्षण करणे ही प्रशासन आणि नागरिक दोघांचीही जबाबदारी असल्याचे सांगत अशा जागांवर अतिक्रमण रोखण्यासाठी महसूल विभाग सतर्क असल्याचे मंडळ अधिकारी विजय गुंडकर यांनी स्पष्ट केले.





Social Plugin