Ticker

6/recent/ticker-posts

झिरपुरवाडी येथे ६० महिलांना साडीचोळी देऊन केले सन्मानित .



महिला दिनानिमित्त अनोखा उपक्रम 

 राजपाल बनसोड 

 तालुका प्रतिनिधी दिग्रस 

 दिग्रस : जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर झीरपुवाडी येथील विविध क्षेत्रात व दिव्यांग, विधवा तसेच शासकीय नोकरी करणाऱ्या महिलांना साडीचोळी वाटप कार्यक्रमाचे आयोजन रुपेश राठोड तसेच ग्रामपंचायत झिरपुरवाडी संयुक्तपणे केले होते. गावातील विविध क्षेत्रातील ६० महिलांना सन्मानित करण्यात आले. सर्व प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशासक पुरुषोत्तम कुडवे, प्रमुख पाहुणे डॉ. संजय कांबळे, रुपेश राठोड, प्रा. उमेश ठाकरे, कान्हुजी मिरासे, विलास डहाणे, रोजगार सेवक शंकर जुडे कारभारी हरी भाऊ राठोड, काजल दुर्गे, पो. पाटील वच्छला मिरासे, आशा सेविका सुनिता बोरचाटे, महानंदा टोगळे, मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय राठोड तर प्रास्ताविक काजल दुर्गे यांनी केले. आज महिलांचे कार्यक्षेत्र चूल आणि मूल या पुरते मर्यादित राहिले नाही. महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समाजकारण, राजकारण तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. ग्रामीण महिलांनाही आपण कुठेही कमी नाही हे लक्षात घेऊन समाजाला दिशा देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन डॉ. संजय कांबळे यांनी केले. महिलांनी स्वतःची क्षेमता ओळखुन निवडलेल्या क्षेत्रात प्रगती करणे शक्य असल्याचे सांगितले. महिलांनी पुढे येत समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करावी, असा संदेशही प्रशासक पुरुषोत्तम कुडवे यांनी यावेळी दिला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील युवकांनी एकत्र येऊन पार पाडले.