बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
शासकीय सेवेतील प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम म्हणजे सोमनाथ दामू जाधवमंत्रालयीन पोलीस कर्मचारी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळणारे तसेच पोलीस खात्यातून कार्यालयीन अधीक्षक या पदावरून जाधव साहेब नुकतेच सेवानिवृत्त झाले. या निमित्ताने पळसदेव (ता. इंदापूर) येथे आयोजित करण्यात आलेला त्यांचा सेवापूर्ती सोहळा केवळ निवृत्तीचा कार्यक्रम न ठरता, एका जनसेवकाचा कृतज्ञता सोहळा ठरला.या कार्यक्रमात बोलताना भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे राज्य सरचिटणीस रामचंद्र जाधव सर यांनी आपल्या
भावना व्यक्त केल्या की, "काही माणसे खुर्चीमुळे मोठी होतात, तर काही माणसे आपल्या कामामुळे खुर्चीला मोठेपण देतात. सोमनाथ जाधव हे अशाच 'तत्पर' कार्यकर्त्यांपैकी एक आहेत. आज ते गणवेशातून निवृत्त होत असले, तरी समाजाच्या कामातून ते अधिक वेगाने सक्रिय होतील, याची आम्हाला खात्री आहे."अडीच हजार कुटुंबांचे आधारस्तंभराज्य संघटनेचे कैकाडी समाजाचे अध्यक्ष हनुमंत माने गुरुजी यांनी जाधव यांच्या कार्याचा गौरव करताना एका विशेष पैलूवर प्रकाश टाकला. ते म्हणाले:
"सोमनाथजींनी केवळ नोकरी केली नाही, तर गेल्या ३० वर्षांत वधू-वर सूचक मंडळाच्या माध्यमातून तब्बल २,५०० मुला-मुलींचे विवाह जमवून अडीच हजार कुटुंबांना आनंदाचे क्षण दिले. समाजाचे 'क्षेत्र बंधन' उठवण्यासाठी त्यांनी दिलेला लढा ऐतिहासिक आहे."त्यांच्या या विधायक कामाची दखल घेत राज्य कर्मचारी संघटनेने त्यांना 'सेवा गौरव पुरस्कार' देऊन गौरविले आहे. तसेच त्यांना 'अखिल भारतीय साहित्य पुरस्कार ही प्राप्त झाला असून, चळवळीतील त्यांच्या योगदानाबद्दल आजवर विविध स्तरांवर त्यांचा सन्मान झाला आहे.
या सोहळ्याला राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. यामध्ये विद्यमान पंचायत समिती सदस्य श्रीराज भरणे, बंडू काळे.प्रशासकीयअधिकारीरघुनाथ जाधव (निवृत्त पोलीस उपविभागीय अधिकारी), जगदेव जाधव (निवृत्त मुख्य अभियंता).जयशंकर माने, ज्ञानेश्वर जाधव छत्रपती संभाजीनगर, प्रा. अर्जुन जाधव (कोल्हापूर). स्वरूपचंद गायकवाड अहिल्यानगर, युवा व व्यावसायिक, सतीश माने (IDFC), राहुल जाधव (युवक अध्यक्ष), उद्योजक पोपटराव गायकवाड, संतोष बनसोडे (सरपंच).राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले कैकाडी समाजाचे बांधव आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.





Social Plugin