Ticker

6/recent/ticker-posts

उपविभागीय कार्यालय कळमेश्वर येथे लाईनमन दिवसाचा कार्यक्रम उत्साहात साजरा.



सतीश पांडे  (कळमेश्वर प्रतिनिधी)

कळमेश्वर :– दिनांक ०४/०३/२०२६ ला  उपविभागीय कार्यालय कळमेश्वर येथे लाईनमन दिवसाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वीज वितरण व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लाईनमन बांधवांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमात त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे आणि कठोर परिश्रमांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच सुरक्षिततेचे महत्त्व आणि सेवा कार्यातील योगदान याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थितांनी लाईनमन बांधवांच्या कार्याला सलाम करत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या

सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कार्यकारी अभियंता सावनेर विभाग श्री सुधीर हेडाऊ साहेब लाभले तसेच प्रमुख उपस्थिती श्री रोशन शेंद्रे साहेब उपकार्यकारी अभियंता, कळमेश्वर उपविभाग, श्री. विशाल ढोले साहेब सहाय्यक अभियंता कळमेश्वर शहर , श्रीमती मयुरी बेरड मॅडम सहाय्यक अभियंता कळमेश्वर , श्री राहुल हेडाऊ साहेब सहाय्यक अभियंता गोंडखैरी , श्री पारितोष आगरकर साहेब सहाय्यक अभियंता कळमेश्वर ग्रा-1, श्री दिनेश संसारे साहेब कनिष्ठ अभियंता कळमेश्वर ग्रा-2 तसेच श्री. रजत पवार साहेब कनिष्ठ अभियंता धापेवाडा , हे मंचकावर उपस्थित होते.

मा. कार्यकारी अभियंता श्री हेडाऊ साहेब सावनेर यांनी विद्युत सुरक्षे विषयी सर्व कर्मचाऱ्यांना अवगत करून दिले तसेच कळमेश्वर उपविभागामार्फत सर्व जनमित्र तसचे बाह्यस्तोत्र कर्मचारी यांना विद्युत सुरक्षा साधनाचा वाटप करताना सर्व जनमितत्राना व बाह्यस्तोत्र कर्मचाऱ्यांना विद्युत सुरक्षे बाबत जागृत करण्यात आले. जनमित्र तर्फे श्री. राजेश राऊत, श्री देवानंद सिरसे व श्री.केशव ताजने यांनी आपले मनोगत व्यक्त केले.