Ticker

6/recent/ticker-posts

बुध ग्रामपंचायतीच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमिताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

 


बुध  दि  [प्रकाश राजेघाटगे ] 

 स्त्रीचा नुसता सन्मान व पुजा करून चालणार नाही . स्त्रीला ताकद देण्याची गरज असून  सर्वसामान्य नारी शक्तीचा सन्मान युती सरकार करत आहे .महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून विविध उद्योगधंदे सुरू करून स्वावलंबी बनावे , असे आवाहन नवनिर्वोचित जिल्हा परिषद सदस्या डॉ . प्रियाताई शिंदे यांनी केले .  बुध ग्रामपंचायतीच्या वतीने  आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमिताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . त्यावेळी डॉ . शिंदे बोलत होत्या .  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काटेवाडीच्या सरपंच सौ . शुभांगी कोरडे होत्या .  यावेळी   सरपंच सौ सुजाता बोराटे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य , उपसरपंच अभयसिंह राजेघाटगे, अॅड . सौ शुभांगी जगदाळे , ग्रामपंचायत सदस्य सौ उज्वला घाटगे, सौ दिपाली कुंभार, शारदा कचरे,  सौ . प्राजक्ता कदम  ,  सौ . प्रिती त्रिपुटे ,आशा सेविका , अंगणवाडी सेविका  व बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या .  काटेवाडीच्या सरपंच शुभांगी कोरडे, अॅड. शुभांगी जगदाळे, श्रद्धा पवार ,अमृता काटकर, योगिता मेळावणे, छाया जगदाळे, प्रीती त्रिपुटे व संगीता जगदाळे यांनी आपले विचार मांडले. माहिला दिनाचे औचित्य साधुन खेळाडू मुलींचा सत्कार करण्यात आला. सन 2025/26 या वर्षात स्कूल गेम अंतर्गत 52 ते 54 वजनी गटात बॉक्सिंग खेळात जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकविलेल्या सृष्टी धनंजय मखरे, म्हसवड येथे झालेल्या जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत नेहा विक्रम चव्हाण सिल्वर मेडल, आदिती मोहनेश्वर पाटोळे सिल्वर मेडल ,आरोही विकास चव्हाण गोल्ड मेडल तसेच आसाम येथे झालेल्या थांग ता स्पर्धेत तनिष्का रमेश कुंभार गोल्ड मेडल व आसाम येथे झालेल्या थांग ता स्पर्धेत मनस्वी दत्तात्रय खवळे सिल्वर मेडल यांचा सत्कार  पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य सौ उज्वला  घाटगे,सौ.प्राजक्ता कदम, सौ दिपाली  कुंभार, शारदा कचरे यांच्या हस्ते सर्व आरोग्य सेविका ,आशा सेविका ,अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस, बचत गट, सीआरपी बचत गट, अध्यक्ष ,सचिव बँक सखी तसेच उपस्थित महिलांचा सत्कार करण्यात आला.डॉ. प्रियाताईं शिंदे म्हणाल्या की  महिलांनी पुढील वर्षी खाद्य जत्रा म्हणून कार्यक्रम साजरा करावा . त्यातून महिलांना उद्योग व्यवसाय करण्यास चालना मिळेल.  बुध  ग्रामपंचायत सदस्य ,महिला,ग्रामपंचायत अधिकारी महेश  ताम्हाणे, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमात आरोग्य शिबिर देखील आयोजित करण्यात आले होते .महिलांनी समूहगीत सादर केले . प्रास्ताविक सरपंच सौ . सुजाता बोराटे यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. स्वरा यशवंत माने यांनी केले .  आभार सौ दिपाली  कुंभार यांनी केले .