बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
पुसेगाव येथील कचऱ्याचा प्रश्न व रथमार्ग यासाठी गावची बांधिलकी म्हणून गट तट न पाहता सोमवार दि . ९ मार्च रोजी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख ( उबाठा ) प्रताप जाधव यांनी दिला आहे . यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे , असे आवाहन त्यांनी केले आहे . सातारा जिल्ह्यात सुप्रसिद्ध श्री सेवागिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुसेगाव नगरी विविध समस्याने ग्रासलेली आहे . गावातील प्रतिनिधींची उदासीनता व प्रशासनाचा भोंगळ कारभारामुळे कचऱ्याचे मोठे ढीग रस्त्याला पडले आहेत .रथ मार्गाचे रखडलेले काम, पाणी योजनेचा झालेला खेळ व ग्रामपंचायतीवर अजूनही नेमणूक न झालेला प्रशासक या गोष्टीमुळे गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले असून येणाऱ्या सोमवारी रस्त्यावर उतरणार आहेत . प्लास्टिक मुक्त पुसेगाव, स्वच्छ सुंदर पुसेगाव ,फसवी जाहिरातबाजी ,कर वसुलीसाठी लावलेला तगादा, विविध सुविधेसाठी वंचित असलेले ग्रामस्थ, खोट्या आश्वासनापेक्षा प्रशासनाने गावातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत .
कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला असून दोन ते तीन महिने झालं कचरा प्रश्न मिटलेला नाही . रस्त्याच्या चारी रोडला कचऱ्याचे मोठमोठे ढीग पडलेले आहेत .धुराचे लोट कायम चालू आहेत . मागील महिन्यात अशीच एक महिला कचरा टाकण्यासाठी गेली असतात तिचा अपघाती मृत्यू झाला यास जबाबदार कोण ? संबंधित जबाबदार अधिकाऱ्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा , रथ मार्गाचे काम पूर्ण रखडलेले आहे . मोठे खड्डे काढून रथ मार्गाचे काम प्रलंबित पडले आहे . पिण्याच्या पाण्याचेही काम बे भरोशाचे आहे . या सर्व विषयावर ग्रामस्थ आक्रमक असून गट तट न पाहता, निवडणुका येतील जातील, परंतु गावचा स्वाभिमान व विकासाचा पर्व अबाधित चालू राहवे यासाठी सोमवारी प्रशासनाला जाब विचारण्यासाठी मोठ्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उपस्थित रहा, असे आवाहन प्रताप जाधव यांनी केले आहे . या प्रश्ाबाबत गटविकास अधिकारी योगेश कदम याच्या उपस्थित मागण्याचे निवेदन देण्यात येणार आहे . संबंधित सर्व विभागांना संबंधित निवेदनाच्या प्रती देण्यात आले आहेत तरी प्रशासनाने याची दखल गांभिर्याने घ्यावी, असे आवाहन जाधव यांनी केले आहे .





Social Plugin