Ticker

6/recent/ticker-posts

नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीत शिवजयंतीकडे दुर्लक्ष? सत्तेत शिवसेना, पण नगरपंचायतीत शिवजयंतीच नाही; नागरिकांमध्ये नाराजी



प्रतिनिधी - गौरव ब्राम्हणवाडे 

अविनाश ब्राम्हणवाडे यांचा पुढाकार; नगरपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन

नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची सत्ता असतानाही छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नगरपंचायत कार्यालयात कोणताही अधिकृत कार्यक्रम आयोजित करण्यात आला नसल्याने शहरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी सुमारे ४ वाजेपर्यंतही नगरपंचायत कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले नव्हते. ही बाब लक्षात येताच अविनाश भाऊ ब्राम्हणवाडे यांनी नगरपंचायत कर्मचाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली.

त्यानंतर त्यांनी स्वतः पुढाकार घेत नगरपंचायत कार्यालयात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवजयंती साजरी केली. यावेळी काही स्थानिक कार्यकर्ते व नागरिकही उपस्थित होते.

नगराध्यक्ष पद शिवसेनेकडे असतानाही शिवजयंतीसारखा ऐतिहासिक आणि प्रेरणादायी दिवस नगरपंचायतीत साजरा न झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. काही नागरिकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की,

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा राजकारणात वापर करणाऱ्यांकडूनच त्यांच्या जयंतीकडे दुर्लक्ष होत असेल, तर ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.”

दरम्यान, या प्रकरणी नगराध्यक्ष किंवा नगरपंचायत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.

उपस्थित :मंगेशजी देवळे, सुरज सोनोने, कार्तिक सोनगडे, प्रज्वल लोहकरे, मुकेश ठवकर, अभिषेक पवार, वैभव कोडवते.