बुध दि . [ प्रकाश राजेघाटगे ]
पुसेगाव येथील प्रसिद्ध व्यापारी विनायकशेठ मुरलीधर तारळकर (वय ८१) यांचे अल्पशा आजाराने आज निधन झाले. उद्योजक संतोष तारळकर यांचे ते वडील होत. 'आप्पा' या नावाने ते परिचित होते. कांदा, बटाट्याचा ते होलसेल व्यापार करत होते. शेतकऱ्यांशी त्यांचे स्नेहपूर्ण संबंध होते. व्यापार करतानाही शेतकऱ्यांच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या पश्चात मुलगा, विवाहित मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. अंत्यसंस्कारासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह व्यापारी उपस्थित होते. रविवारी (ता. ८) सकाळी ८.३० वाजता पुसेगाव येथे सावडण्याचा विधी होईल





Social Plugin