


भेंडा बु. (प्रतिनिधी) –
नाथषष्टी उत्सवानिमित्त शिर्डी ते पैठण अशी निघालेल्या पायी दिंडीचे भेंडा बु. येथे मित्रपरिवाराच्या वतीने सालाबाद प्रमाणे उत्साहात स्वागत करण्यात आले. दिंडी गावात दाखल होताच वारकरी व ग्रामस्थांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि भगव्या पताकांच्या साक्षीने दिंडीचे स्वागत केले.
यावेळी दिंडीत सहभागी वारकरी पारंपरिक वेशभूषेत “एकनाथ-ज्ञानोबा-तुकाराम” आणि “जय साई राम ”च्या जयघोषात पुढे चालत होते. काही वारकरी भगवे झेंडे घेऊन चालत होते, तर काहींनी टाळ-मृदुंगाच्या तालावर अभंग गात भक्तिमय वातावरण निर्माण केले होते.
भेंडा बु. येथे पोहोचल्यावर ग्रामस्थांनी दिंडीतील वारकऱ्यांचे पुष्पहार घालून व सत्कार करून स्वागत केले. तसेच काही भक्तांनी वारकऱ्यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला. दिंडीतील प्रमुख मान्यवरांनाही शाल व फेटा देऊन सन्मानित करण्यात आले.
नाथषष्टी निमित्त दरवर्षी शिर्डी ते पैठण अशी पायी दिंडी निघते. संत एकनाथ महाराजांच्या पैठण नगरीत पोहोचण्यासाठी वारकरी अनेक दिवस पायी प्रवास करत असतात. या प्रवासात विविध गावांमध्ये दिंडीचे स्वागत व भोजनाची व्यवस्था करण्यात येते.भेंडा बु. येथील ग्रामस्थांनीही दिंडीतील वारकऱ्यांसाठी थंडगार लस्सी, तसेच विश्रांतीची व्यवस्था केली होती. यामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
या स्वागत सोहळ्यास गावातील भानुदास गोंडे, लक्ष्मण चामुटे , मोहन पेहरे,संजुमामा वायकर, रामकिसन आरगडे,विलास आरगडे,भालेराव शरद,मोरकर सर ,नवले सुनिल,संतोष फुलारी,सादिक सय्यद,अरबाज शेख,रितेश भालेराव,सोहेल सय्यद,रंधवे कीरण,तेजस कुऱ्हाडे,सोमनाथ वाघडकर,शेळके निलेश,पवन चौधरी,रूषीकेश मोरकर अनेक नागरिक, वारकरी तसेच तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Social Plugin