प्रतिनिधी : विजय गायकवाड
रिसोड : येथील स्व. पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण विभागाचा विद्यार्थी क्रिश जयस्वाल याची बॉल बॅडमिंटन खेळामध्ये थायलंड बँकॉक येथे जाणाऱ्या भारतीय संघामध्ये निवड झालेली आहे. त्यासंबंधित निवडीचे महाविद्यालयास पत्र मिळाले असून बॉल बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव राजाराम तसेच महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन फेडरेशन चे सचिव अतुल इंगळे यांनी सांगितले की दि. 10 ते 15 मार्च 2026 दरम्यान बँकॉक येथे होऊ घातलेल्या इंडो - थाय बॉल बॅडमिंटन सिरीज साठी संपूर्ण भारतातून दहा खेळाडूची चमू तयार करण्यात आली आहे त्यातील महाराष्ट्र राज्यातून दोन खेळाडूंची वर्णी लागली आहे.
संपूर्ण भारतभर झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेमध्ये क्रिस जयस्वालच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर त्यानी या यशाला गवसणी घातलेली आहे. दिनांक 10 मार्च रोजी भारतीय पुरुष संघ कोलकत्ता येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बँकॉक थायलंड साठी उड्डाण करेल. सध्या भारतीय संघ प्रशिक्षक बिहार येथील गौरीशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ आपला सराव करीत असून विदेशात खेळण्यास जाणार आहे. अत्यंत तांत्रिकदृष्ट्या कौशल्यपूर्ण बॉल बॅडमिंटन खेळामध्ये रिसोड मधून खेळाडूच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील निवडीसाठी जीवन विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबारावजी पाटील, सचिव अमितभाऊ पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एन. गायकवाड, शारीरिक शिक्षण संचालक विभागप्रमुख प्रा डॉ. तनय गोडे तसेच वाशिम डिस्ट्रिक्ट स्पोर्ट ऑफिसर किशोर बोन्डे यांनी क्रिश चा सत्कार करीत त्याच्या परदेशवारी आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.





Social Plugin