Ticker

6/recent/ticker-posts

प्रा. निशिकांत भास्करराव संगवे सरांचा सेवापूर्ती समारंभ.



यशवंत पवार कन्नड

कन्रानड येथील रामराव पाटील बहिरगांवकर एम.सी.व्ही.सी. कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक प्रा. निशिकांत भास्करराव संगवे सर प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवामुक्त झाले.त्यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. महाले साहेब उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून श्री. चंद्रकांत देशमुख, श्री. बाबासाहेब मोहिते आणि श्री. विशाल आहेर यांनी उपस्थित राहून सरांच्या कार्याचा गौरव केला. प्राध्यापक संगवे सर यांचे वडील श्री भास्कररावजी संगवे  यांची  निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी प्रा हुकूमचंद पवार, प्रा. शिंदे, प्रा. भानुसे, प्रा. व्ही. के. देशमुख, प्रा. शिवाजी हुसे आणि प्रा. झाडे यांनी सरांच्या कार्यकाळाचा सविस्तर आढावा घेत त्यांच्या विद्यार्थीकेंद्री कार्याची प्रशंसा केली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भोसले सर यांनीही सरांनी केलेल्या उत्कृष्ट व समर्पित कार्याचे मनापासून कौतुक केले.या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. मगर, प्रा. अभय आहेर, प्रा. देशमुख एस. ए., तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. राजेश नागे, प्रा. अभिजित मांडे व श्री. आदिक बी. जी. यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुंदर व ओघवते सूत्रसंचालन प्रा. प्रकाश खेत्री सरांनी केले.