बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]]
श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉ. राधाकृष्णन इंग्लिश मिडीयम स्कूल पुसेगाव मध्ये मराठी नवीन वर्ष उत्साहात साजरा करण्यात आला.
महाराष्ट्रात दरवर्षी गुढीपाडवा या दिवशी मराठी नवीन वर्ष सुरू होते. या दिवशी डॉ. राधाकृष्णन इंग्लिश मिडीयम स्कूल, पुसेगाव मध्ये शैक्षणिक पुस्तकांची गुढी वेगळ्या पद्धतीने उभारण्यात आली. सरस्वती मातेचे आणि गुढीचे व पुस्तकांचे पूजन करण्यात आले. गुढीपाडवा या नववर्षाच्या निमित्ताने सन.2026-27 या शैक्षणिक वर्षाकरिता गुढीपाडवा पट वाढवा या नवीन प्रवेश प्रक्रियेचा शुभारंभ मा.मुख्याध्यापिका कु. धनश्री पोतदार यांनी तसेच शिक्षक ,शिक्षकेतर स्टाफ, विद्यार्थी , पालक,बस सेवा करणारे अंकल सर्वांच्या हस्ते करण्यात आले.पुस्तकांची गुढी उभारून वेगळा पद्धतीने विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होते. गुढी आपल्याला अज्ञानाकडून प्रकाशाकडे नेऊ शकते. सांस्कृतिक धार्मिक वारसा जपता येतो. असा उद्देश यामागचा आहे असे धनश्री पोतदार यांनी म्हणले. यावेळी डॉ. राधाकृष्णन इंग्लिश मिडीयम स्कूल च्या मुख्याध्यापिका धनश्री पोतदार सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी, स्कूलचे प्रशासकीय अधिकारी मा प्राचार्य श्री शिंदे डी. पी सर आदी यांनी शुभेच्छा दिल्या. वेगळा उपक्रम राबविल्याने सन्माननीय संस्था अध्यक्ष, उपाध्यक्ष,सचिव, खजिनदार, सर्व विश्वस्त,विद्यार्थी गुणवत्ता वाढ प्रकल्प अधिकारी, स्कूलचे प्रशासकीय अधिकारी यांनी कौतुक केले. अशा रीतीने गुढीपाडवा सण उत्साहात शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला.





Social Plugin