बुध दि . [ प्रकाश राजेघाटगे ]
बुध ता . खटाव येथील लालबाग शिवारातील महावितरणच्या सात लाईटपोल खांब्यावरील सुमारे सातहजार फूट अल्युमिनियम तारेची चोरी झाल्यामुळे शेतकऱ्याला विहीरीत पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नसल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे . या नुकसानिस जबाबदार कोण ?असा सवाल , अशी चर्चा सुरु आहे . याबाबत अधिक माहिती अशी , बुध ता . खटाव येथील शेतकरी संतोष रंगराव सुर्यवंशी यांचे लालबाग शिवारातील शेतातील सात पोलमधील ७००० फूट अल्युमिनियम तार चोरीस गेल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे . या नुकसानीस जबाबदार कोण ?असा सवाल शेतकरी करीत आहे . बुध ता . खटाव येथील संतोष रंगराव सुर्यवंशी व आर्मीतील जवान अमोल हा छत्तीसगडमध्ये तर संदिप हा जम्मू काश्मिर येथे देशाची सेवा करीत आहेत . यांचे गटनः १२५ , २२६ मध्ये शेती आहे . यामध्ये कांदा दोन एकर , गहू दोन .एकर , मेथी १०गुंटे , भुईमूग १० गुंटे अशी पिके आहेत . आज सकाळी शेतामध्ये कांद्याला पाणी देण्यासाठी गेला असता मोटर सुरू होत नव्हती . यावेळी पोलकडे लक्ष गेले असता पोलवरती ताराचं नव्हत्या . संपूर्ण भागाची पाहणी केली असता सात पोलमधील ताराचं चोरी गेल्याचे लक्षात आले . या तारा चोरून नेहण्यासाठी टॅक्टरचा वापर केला असल्याचे निदर्शनास आले .
याबाबत महावितरणचे शाखा अभियंता आटपाटकर यांना माहिती देण्यासाठी फोन केला तर त्यांनी फोन उचलला नाही . दोन ते तीन वेळा फोन केल्यानंतर त्यांनी मोबाईल बंद करून ठेवला . जर अधिकाऱ्यांनी असे केले तर शेतकऱ्यांने काय करायचे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे .





Social Plugin