प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी
NMMS शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेत *इंग्रजी माध्यमातून१६* पारंगत विद्यार्थ्यांच्या सुयशाने शाळेचा उत्कृष्ट निकाल
मंगरूळ नवघरे : चिखली तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मंगरूळ नवघरे येथिल विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती एन एम एम एस स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन करून तालुक्यातील हायस्कूल विभागातून उत्कृष्ट कामगिरी करीत शाळेच्या व गावाच्या लौकीकात भर घालून मानाचा तुरा रोवला आहे .
याबाबत असे की , यावर्षी तालुक्यातील हायस्कूल विभागातून शाळेचे तब्बल १६ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत इंग्रजी माध्यमातून पारंगत झाले असून शाळेचा उत्कृष्ट निकाल लागला आहे .
या शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेत यश मिळवणाऱ्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांमध्ये प्रामुख्याने कु .अनहा शेख अनिस , कु . नम्रता संजय येळवंडे या विद्यार्थिनींनी गुणांकनात बाजी मारली असून शाळेतून अनुक्रमे प्रथम, व्दीतीय क्रमांक पटकावले आहेत तर सार्थक राम पवार , कु . समृद्धी सतिश आंभोरे , ऋषीकेश गणेश नवघरे , कु . स्नेहल पवन मगर , राघव रामेश्वर धमक , कु . श्रृती गणेश शेजोळ , कु . श्रेया समाधान पानगोळे , शिवम बद्री कृपाळ, कु . सुकेशनी गजानन गाडे , कु . लक्ष्मी नितीन जाधव , सार्थक प्रशांत जाधव , प्रेम प्रकाश जाधव , बाळू गौतम जाधव , ओम सुनिल पवार
या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले असून या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शाळा समितीच्या वतीने गुणगौरव करण्यात आला . यावेळी विद्यार्थ्यांना वेळोवेळी जादा तासिका घेऊन मार्गदर्शन करणारे शाळेचे अनुभवी तज्ञ मार्गदर्शक शिक्षक रामनंदन केदार , वर्गशिक्षक प्रशांत डहाळे , परमेश्वर सुर्वे , डी . एस . वायाळ , प्रा . रविकुमार शेळके व महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य वसंतराव गाडेकर यांचा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामेश्वर धमक , ज्येष्ठ मार्गदर्शक तथा माजी सरपंच मनोहर शिंदे , नितीन तांबट , स्वप्नील कठाळे , किशोर अंभोरे तसेच स्थानिक जि . प . केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अमोल अंभोरे , अध्यापक दिनेश पवार , निलेश जाधव, अरुण मुरकुटे, गजानन तावरे यांचेकडून सत्कार करण्यात आला .
याप्रसंगी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक लक्ष्मण सरोदे , प्रा .दत्तात्रय वांजोळ , अविनाश घुगे , गजानन गोसावी , राजेंद्र चव्हाण , सुनयना नेवारे , इरफान पटेल , कविता उंबरकर, पंढरी रिंढे , रामेश्वर तोंडे , कल्पना जाधव , निलाक्षी भालेराव , तुषार कुसुंबे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेसह विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते .





Social Plugin