देवगड प्रतिनिधी अमोल शिर्के
गाव पुरळ, कलंबई, केळये वाडी येथे शिमगा उत्सव निमित्त दारा दारात खेळे गावातील स्थानिक ग्रामस्थ व मुंबईचे चाकरमानी होळी उत्सवानिमित्त साजरा करतात. अनेक ठिकाणी गाव पुरळ येथील देवाचे खेळे हे प्रत्येकाच्या वाडी वाडीत जाऊन आपले देव तुळशीकडे पूजन करून होळी उत्सवा सण अतिशय थाटामाटात ढोल ताशे ग्रामीण संस्कृतीला असे शोभणारे नृत्य त्याचप्रमाणे गावातील जी संस्कृती आहे त्या संस्कृतीला जपणारे देवस्थानातील काम देवाची जी काही काम आहेत ते जपणारे स्थानिक ग्रामस्थ ते हिराहिरीने या कार्यक्रमात भाग घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवताना दिसतात. पुरळ गावातील कापड खेळे अनेक वाडी वाडीत जाऊन त्यातील जी काही देवाची काम आहेत लोकांचे नवस त्याचप्रमाणे श्रीफळ, यांचे नवस फेडले गेले आहेत त्यांचे नवस हे सुद्धा देवस्थानातीलच काम आहेत आणि ते इकडील ग्रामस्थ हे अतिशय भावपूर्ण व भक्तिभावाने देवाची काम पार पडताना दिसतात. असा हा शिमगा उत्सव कोकणात दर ठिकाणी साजरा होतो.
प्रत्येक ठिकाणचे रीती रिवाज वेगवेगळे असून स्वरूप ते एकाच ठिकाणचे असते. अनेक ग्रामस्थ स्थानिक मुंबईचे चाकरमानी पर्यटक हा कार्यक्रम बघायला आवर्जून कोकणामध्ये येतात. पुरळ गावचे कापडखेळे यांचे जे नृत्य आहे हे अतिशय मनमोहक व कोकणाच्या संस्कृतीला शोभणारे असे आहे. हे कापडखेळे प्रत्येकाच्या दारोदारी जाऊन तुळशीला आपल्या देवाची भक्तीपूर्वक तुळशीची पूजा अर्चना करतात. देवाची गारानी व मालकांचे नवस असे हे कार्यक्रम या सणाला असतात. असे हे शिमग्या सणाचे कोकणातल्या संस्कृतीचे कापडखेळे उत्कृष्टपणे आपलं नृत्यकला दाखवून देवाची मनोभावे प्रार्थना करून शिमगा हा सण साजरा करून मनाला हलवून जातात. असा हा कोकणातील शिमगा उत्सव सण दर सालाबाद प्रमाणे थाटामाटात ढोल ताशे यांच्या गजरात साजरा केला जातो. अशा या कोकणातील संस्कृतीला आमच्या कोकणवासी यांचे कोटी कोटी प्रणाम आहेत





Social Plugin