प्रतिनिधी : विजय गायकवाड
रिसोड : येथील स्व. पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. जान्हवी उमाकांत मैंद विज्ञान भाग-II विद्यार्थिनी लोणार महोत्सव, दिनांक ६ मार्च २०२६ कै. कु. दुर्गा क. बनमेरू विज्ञान महाविद्यालय लोणार येथे आयोजित Flower decoration (Eco-friendly) स्पर्धा मध्ये द्वितीय क्रमांक विजेती ठरली. तसेच ती स्थळ चित्र (स्पॉट पेंटिंग) मध्ये सुद्धा सहभागी झाली. तिच्या या यशाबद्दल जीवन विकास शिक्षण संस्थाध्यक्ष बाबाराव पाटील खडसे, सचिव अमित पाटील, संचालक अक्षय पाटील, कार्यकारी अधिकारी (उ. शि.) डॉ. जे. बी. देव्हडे यांचेसह जीवन विकास शिक्षण संस्थेच्या सर्व संचालकांनी तिचे कौतुक केले आहे.
तिला प्राचार्य डॉ. एम. एन. गायकवाड, डॉ. आदिनाथ बदर, डॉ. आम्रपाली भगत(वनस्पतीशास्त्र) आणि प्रा कु पल्लवी देशमुख (गृहअर्थशास्त्र विभाग) यांचे मार्गदर्शन लाभले आहे. ९-वे लोणार महोत्सव स्पर्धमध्ये विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीं स्पर्धेत सहभाग नोंदविला. वाशिम बुलढाणा मेहकर छ. संभाजीनगर व लोणार परीक्षेत्रातील अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी जान्हवी मेंद हिने स्पर्धा करीत हा क्रमांक मिळविला ही विशेष कौतुकाची बाब आहे. यापूर्वी याच महाविद्यालयातील अनेक विद्यार्थिनींनी विविध कलागुण व स्पर्धा मध्ये यश मिळविले आहे. तिच्या या यशामागे तिचे आईवडील आणि कुटुंबीयांसह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचे योगदान आहे.





Social Plugin