Ticker

6/recent/ticker-posts

गांधी विचार संस्कार परीक्षेत यावर्डीची वेदिका कदम जिल्ह्यातून दुसरी .



 गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी 

       गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव तर्फे गांधी विचार संस्कार परीक्षा 2025 चे आयोजन बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालय,यावर्डी येथे मुख्याध्यापक विजय भड यांच्या मार्गदर्शनात प्रथमच करण्यात आले होते. सदर परीक्षेमध्ये 54 विद्यार्थ्या पैकी 54 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. तर कु. वेदिका मोहन कदम हिने जिल्ह्यातून दुसरा क्रमांक प्राप्त करून सिल्वर मेडल मिळवले आहे.

 गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव तर्फे दरवर्षी गांधी विचार संस्कार परीक्षा आयोजित केली जाते. यावर्षी बाबासाहेब धाबेकर विद्यालय,यावर्डी येथे प्रथमच सदर परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. गांधी विचार संस्कार परीक्षा 2025 मध्ये गांधीजीचे विद्यार्थी जीवन या परीक्षेत 14 विद्यार्थी, गांधीजीचा विद्यार्थ्यांना संदेश या परीक्षेत 16 विद्यार्थी, तर एकादश व्रत दर्शन या परीक्षेत 24 विद्यार्थी असे एकूण 54 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले म्हणजेच शंभर टक्के निकाल लागला आहे. 54 विद्यार्थ्या पैकी वर्ग आठवीची कु. वेदिका मोहन कदम हिने गांधीजीचे विद्यार्थी जीवन या परीक्षेत वाशिम जिल्ह्यातून द्वितीय स्थान प्राप्त केले. त्याबद्दल तिला गांधी रिसर्च फाउंडेशन तर्फे सिल्वर मेडल व सन्मानपत्र देण्यात आले. उत्तीर्ण झालेले 54 विद्यार्थी व जिल्ह्यातून दुसरी आलेली सिल्वर मेडल प्राप्त केलेली विद्यार्थिनी कु. वेदिका कदम यांचा शाळेचे मुख्याध्यापक विजय भड, परीक्षा समन्वयक अनिल हजारे व उपस्थित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.