Ticker

6/recent/ticker-posts

तडवळे विकास सेवा सोसायटीमध्ये, भैरवनाथ विकास पॅनलचा झेंडा



बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

तडवळे ता .खटाव येथील विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी श्री भरत पाटील तर व्हा. चेअरमन पदी शांतीलाल काळे यांची बिनविरोध निवड झाली ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्री अतुल यलमर यांनी दिली. 

यावेळी नूतन संचालक श्री छगन खाडे पाटील, सौ गंगुबाई खाडे, सुधीर साबळे, बाळासो विष्णू साबळे, गौतम मोरे यांनी सहकार्य केले. 

यावेळी नूतन चेअरमन श्री भरत पाटील यांनी ग्रामस्थांनी केलेल्या स्वागत समारंभनंतर ते म्हणाले की शेतकऱ्यांच्या प्रश्नाला प्राधान्याने न्याय देणार तसेच सर्व संचालक यांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. वेळी भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे प्रमुख विकास साबळे, बाळासो खाडे गुरुजी, प्रमोद खाडे गुरुजी, नितीन पळे शेठ अध्यक्ष भैरवनाथ यात्रा कमिटी, अमोल साबळे माजी सरपंच ,बाळासो पवार ग्रामपंचायत सदस्य, बाबुराव मदने उपसरपंच ,पोपटराव पळे मा.सरपंच, डॉ. महादेव पाटील, हनुमंत मदने, अशोक पाटोळे, सुभाष खाडे ,राजू हांगे ,सचिन पळे ,मारुती साबळे ,नारायण साबळे, ओंकार किरवे, नितीन खाडे भाऊ, नितीन साबळे, आनंदराव माळवे, प्रेमचंद खाडे ,धनंजय साबळे जाबर, ॲड. अनिल बनसोडे, सुभाष बनसोडे ,भीमराव साबळे इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद  खाडे गुरुजी यांनी केले. यावेळी भैरवनाथ विकास आघाडीचे मार्गदर्शक विकास साबळे ,अमोल साबळे मा.सरपंच,राजू हांगे ,शरद पाटील संचालक मार्केट कमिटी,इत्यादींनी आपली मनोगत व्यक्त केली. व सचिन पळे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले