सतीश पांडे कळमेश्वर प्रतिनिधी
कळमेश्वर : 'जागतिक महिला दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक संघटनेचा उपक्रम 'महिलांचे मानसिक आणि आरोग्य' विषयावर जाणीव जागरूकता कार्यशाळेचे आयोजन गजानन मंदिर कळमेश्वर येथे करण्यात आले.
यावेळी प्रसिद्ध तज्ञ डॉ. वानखेडे मेडीकल ऑफिसर डॉ.अर्चना ग्रामीण रुग्णालय समुपदेशक कळमेश्वर, यांनी मार्गदर्शन केले. मुख्य अतिथी म्हणून गीता दळवी पोलीस महिला समुपदेशक, प्रमुख पाहूणे पोलिस स्टेशन कळमेश्वर येथील यांनी महिला पोलिस अधिकाऱ्यांनीही महिलांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण आणि विविध क्षेत्रातील महिलांच्या उल्लेखनीय योगदानाचा सन्मान आणि त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमात सर्वधर्मीय 116 महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन ज्येष्ठ नागरिक संघटने द्वारे उपक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. संचालन ज्येष्ठ नागरिक संघटनेचा उमादेवी गौतम सदस्य, लता वैद्य सदस्य तर आभार अरुण धोटे कोषाध्यक्ष यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृष्णा बगडे अध्यक्ष, मेघराज नवले सचिव , मनोहर राऊत उपाध्यक्ष ,ताज मोहम्मद शेख , हरिभाऊ शिंदे,ज्ञानेश्वर गुळांदे , तुकाराम शेंडे, रमेश ढगे आणि सर्व सदस्य जेष्ठ नागरिक संघटने द्वारे आदींनी परिश्रम घेतले.
🔸 स्वसंरक्षण कार्यशाळा आणि कायदेविषयक मार्गदर्शन महिला दिनानिमित्त विविध माहिती तसेच, महिला विषयक कायद्यांमधील नवीन बदलांची माहिती देत, "स्त्री ही त्याग, धैर्य आणि उज्ज्वल भविष्य घडविणारी मूर्ती आहे," असे प्रतिपादन गीता दळवी पोलीस महिला समुपदेशक यांनी मार्गदर्शन केले.





Social Plugin