बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
विसापूर ता.खटाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अर्णव ज्ञानेश्वर धायगुडे हा नवोदय प्रवेश परीक्षेत ९७.५०% गुण मिळवत पात्र ठरला आहे. सैनिक स्कुल प्रवेश परीक्षेतही त्याने २७८/३०० गुण मिळवत प्रवेश निश्चित केला आहे. शाळेतील इतर विद्यार्थ्यांनीही नवोदय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत शाळेची गुणवत्ता सिद्ध केली आहे. शाळेचे रुही कदम - ९५, श्रवण शिंदे - ९५, अनन्या साळुंखे -९३.२५, स्नेहा कदम-९१.२५, अभय गायकवाड - ९०, कृष्णा ढोले - ९०, सार्थक साळुंखे - ८८.२८, सायली सावंत - ८८.७५, ईश्वरी साळुंखे - ८६.२५, विघ्नेश जाधव - ८६.२५, प्रज्ञा साळुंखे - ८२.५०, सानिध्या सावंत - ८१.२५, सुमित कदम - ७५, आर्या साळुंखे - ७२.५० गुण मिळवत गुणवत्तेची परंपरा जोपासली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशामागे वर्गशिक्षिका सौ.वैशाली नांदे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक श्री.ज्ञानेश्वर धायगुडे, सौ.स्वाती जगताप यांचे परिश्रम व सौ.शुभांगी शितोळे, श्रीम.रेश्मा बोडरे, मुख्याध्यापक लतिका कर्पे, केंद्रप्रमुख श्री.रमेश सूर्यवंशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.प्रियाताई शिंदे, जि. प. सदस्या लताताई कर्णे, पंचायत समिती सदस्या शामलीताई साळुंखे, गटशिक्षणाधिकारी सोनाली विभूते, विस्ताराधिकारी संगिता गायकवाड, सरपंच निलम जगताप, उपसरपंच राजेश ढोले, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शितल साळुंखे, उपाध्यक्ष गणेश सावंत आदी व विसापूर ग्रामस्थांनी विद्यार्थी, शिक्षकांचे अभिनंदन केले.





Social Plugin