Ticker

6/recent/ticker-posts

रोजगार हमी योजना अपहार प्रकरणी शिवसेना आक्रमक.



संतोष वाठोरे प्रतिनिधी 

आज दिनांक 2मार्च 2026 रोजी पंचायत समिती कार्यालय सेनगाव येथे मा. संदेश देशमुख जिल्हाप्रमुख हिंगोली (उबाठा ) यांच्या नेतृत्वात सिंचन विहीर अनुदानामधे व रोजगार हमी योजना मध्ये झालेल्या अपहार प्रकरणी निषेध आंदोलन करण्यात आले.  याविषयी सविस्तर बातमी अशी की मौजे धनगरवाडी तालुका सेनगाव येथे पंचायत समिती सेनगाव अंतर्गत मंजूर झालेल्या सिंचन विहिरीचे अनुदान हे शेतकऱ्यांना न भेटता अधिकारी,कर्मचारी व संबंधित दलाल यांनी परस्पर लाटून, शेतकऱ्याची घोर फसवणूक करण्यात आली आहे.

 याप्रकरणी मौजे धनगरवाडी येथील शेतकऱ्यांनी माननीय जिल्हाधिकारी साहेब हिंगोली यांना निवेदन व तक्रार देऊन पिडीत शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने या भ्रष्टाचार प्रकरणात जे जे गुंतलेले होते त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, व ताबडतोब गुन्हे दाखल करण्यात यावे तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. याकरिता आज माननीय संदेश भाऊ देशमुख जिल्हाप्रमुख शिवसेना (उबाठा)हिंगोली यांच्या नेतृत्वात पंचायत समिती सेनगाव येथे निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या आंदोलनामध्ये श्री संदेश देशमुख, कुंदर्गे पाटील, जगदीश गाढवे, नाना देशमुख, प्रवीण महाजन, सुनील शिंदे तसेच अनेक शेतकरी उपस्थित होते.