Ticker

6/recent/ticker-posts

धनाई बालक मंदिरच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न




गणेश जाधव प्रतिनिधी

टाकळी (ता. जामनेर) येथे धनाई बालक मंदिरचे संचालक श्रीकांत अहिरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तसेच इयत्ता आठवीतील एन.एम.एम.एस. परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला.

एन.एम.एम.एस. परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी दर्शन समाधान मोरे, हर्षल गणेश जाधव, तेजस राहुल दुसाने व रितेश मुरलीधर सपकाळ यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत कठोर परिश्रम व सातत्य यांचे महत्त्व अधोरेखित केले.कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मुला-मुलींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.





या कार्यक्रमासाठी जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र काका पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, महेंद्र भाऊ बाविस्कर (नगरसेवक, जामनेर), कमलाकर भाऊ पाटील (मा. सभापती), नवल भाऊ पाटील राजपूत (माजी सभापती), सदाशिव चौरे सर, इंदिराबाई ललवाणी (उपमुख्याध्यापक, जामनेर), सुपडू सोनार (सेवानिवृत्त शिक्षक, टाकळी), डॉ. राहुल माळी (शांताई हॉस्पिटल, जामनेर), अरुण सातव सर (सातव क्लासेस, जामनेर) आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रामकृष्ण सर गायकवाड (सेवानिवृत्त शिक्षक) यांनी भूषविले. तसेच बाळूभाऊ चौरे (ग्रामपंचायत सदस्य), सारंगधर अहिरे (माजी सरपंच), समाधान वराडे, दीपक बाविस्कर, रमेश वराडे, पवन महाजन, उमेश बंडे तसेच गावातील इतर प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन धनाई क्लासेसचे संचालक श्रीकांत अहिरे सर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.