Ticker

6/recent/ticker-posts

पळशी तांडा पळशी गाव व लालू नाईक तांडा पळशी ग्रामपंचायत यांची ग्रामसभा भ्रष्टाचार यामुळे रद्द.



ग्रामीण प्रतिनिधी :- छगन जाधव पळशी 

पहिली ग्रामसभा ही 30 जानेवारीला होती काही तांत्रिक अडचणीमुळे ती सभा पुढे ढकलून 4 फेब्रुवारी रोजी आयोजित केली होती .पण त्या आयोजित कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवक वेळेवर हजर न राहता त्यामुळे ती सभा स्थगित करण्यात आली. 

ग्रामसभा रद्द करण्याचे कारण गाव तांड्याचा न झालेला विकास त्या कारणामुळे ग्रामपंचायत मधील सदस्य उपस्थित नव्हते आणि त्यांना पाच दिवस आधी सांगून पण त्यांनी त्या सभेला हजर राहिले नाही याचा कारण काय की त्याने केलेल्या भ्रष्टाचारामुळे ते घाबरून गेले .आणि समोरची तारीख देऊ असे पळशी गावातील सरपंच श्री मंगलाताई नेता यांनी सांगितलेले होते 

परंतु आजपर्यंत तारीख आलेली नाही. त्याचं कारण काय की त्यांनी त्यांचे सदस्य ग्रामसेवक, सरपंच , उप सरपंच हे मॅनेज.झाले की काय .आतापर्यंत जवळपास एक महिना झाला तरीही तारीख दिलेली नाही. संपूर्ण गावाकडून तांडा कडून नाराजी व्यक्त होत आहे.मागील झालेल्या किनवट नगरपंचायत च्या निवडणुकीत जाहीर झालेल्या निकालाने राजकीय वर्तुळात चांगलेच खळबळ उडवली आहे .

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना ( उ.बा.ठा)गटाच्या सो. सुजाता येंड्रालावार यांनी भाजपचे आनंद मच्छेवार.यांच्या  सौभाग्यवती पराभव करत दणदणीत विजय मिळवला.पंचायतीत (उ.भा.ठा) 3 भाजपचे 4 राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ) 5 काँग्रेस 1 राष्ट्रवादी (अजित पवार) 5 इतर 3 नगरसेवक विजयी झाले . (उ.भा.ठा ) ( शरद पवार ) यांची युती नगरपंचायत बहुमताच्या दिशेने मजबूत झाली आहे.

या निवडणुकीत सर्व युवा आणि नवीन चेहरे यांना संधी दिली होती . तर नगराध्यक्ष पद सो. सुजाता येंड्रालावार यांनी मशाल पेटवली .आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत समोर कसा विजय मिळवता येईल . यासाठी अँड:- अर्चित नाईक यांनी युवा वर्ग व कार्यकर्त्यांना संबोधित केले.