Ticker

6/recent/ticker-posts

सेजल मोईकरची कमाल! ७८ किलोची दगड-गोटी उचलून मारल्या २५ बैठका.



गणेश गावडे-पाटस प्रतिनिधी

​पिरंगुट/पुणे:मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथे होळीनिमित्त आयोजित पारंपारिक 'दगड-गोटी' या मर्दानी खेळात कु. सेजल विश्वनाथ मोईकर या तरुणीने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ७८ किलो वजनाचा दगड खांद्यावर पेलत तब्बल २५ बैठका मारून, सेजलने ही कामगिरी करणारी महाराष्ट्रातील पहिली महिला होण्याचा बहुमान मिळवला आहे.

​परंपरेने पुरुषांचे वर्चस्व असलेल्या या मर्दानी खेळात, सेजलने दाखवलेली ही शारीरिक क्षमता आणि जिद्द उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. तिचे हे यश 'नारीशक्ती'चा नवा गौरव मानले जात असून, सोशल मीडियावरून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 'सरनौबत नरवीर पिलाजी गोळे प्रतिष्ठान' आणि 'श्री जगदीश्वर मंदिर ट्रस्ट' यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत सेजलने आपल्या मेहनतीचे फळ मिळवले. तिची ही कामगिरी केवळ वैयक्तिक यश नसून, महिलांच्या आत्मविश्वासाचे एक नवे प्रतीक ठरली आहे.