प्रतिनिधी : विजय गायकवाड
हिंगोली : येथील भारतीय विद्या मंदिर शिक्षण संस्था संचलित श्रीमती शांताबाई मुंजाजी दराडे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा हिंगोली जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश सुशीला सखाराम अंभोरे यांना भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल व ग्राहक संरक्षण फाऊंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित ‘आदर्श मुख्याध्यापक सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
हा भव्य सत्कार सोहळा १ मार्च २०२६ रोजी नाशिक येथील न्यू शेवंता बँक्वेट हॉल येथे उत्साहात पार पडला. सहाय्यक आयुक्त मनीष सानप, न्यायाधीश शिल्पा डोलारकर, शिक्षणाधिकारी डॉ. नेहा शिरोळे, राष्ट्रीय ग्राहक संरक्षण समितीचे अध्यक्ष दादाभाऊ केदारे तसेच राष्ट्रीय सचिव डॉ. अविनाश झोटिंग यांच्या हस्ते डॉ. अंभोरे यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना अध्यक्ष दादाभाऊ केदारे म्हणाले की, “डॉ. प्रकाश अंभोरे हे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात निस्वार्थ भावनेने कार्यरत असून त्यांच्या समर्पित सेवेमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडत आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे अनेकांना प्रेरणा व नवी दिशा मिळाली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.”
राष्ट्रीय सचिव डॉ. अविनाश झोटिंग यांनीही आपल्या मनोगतात नमूद केले की, “मुख्याध्यापक डॉ. अंभोरे यांचे शैक्षणिक नेतृत्व, संघटनात्मक कौशल्य आणि सामाजिक बांधिलकी आदर्शवत आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा सन्मान योग्यच आहे.”डॉ. अंभोरे यांना यापूर्वीही विविध मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये ग्लोबल एक्सलन्स आयकॉन अवॉर्ड, राष्ट्रीय शिक्षकरत्न नागरी पुरस्कार, संत गाडगे बाबा राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार, मराठवाडा रत्न पुरस्कार, मराठवाडा भूषण पुरस्कार तसेच स्व. अण्णाराव टाकळगव्हाणकर स्मृती पुरस्कार यांचा समावेश आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. मदन मार्डीकर, सचिव ॲड. गयबाराव नाईक, संचालक केशवराव शिरसाट, पंडितराव बांगर व सर्व सन्माननीय संचालक मंडळाने त्यांचे अभिनंदन केले. तसेच उपमुख्याध्यापक अनिल लोळेवार, पर्यवेक्षक भारत शिंदे, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव विठ्ठल सोळंके, प्राचार्य बाबासाहेब इंगोले, प्राचार्य विठ्ठल मुटकुळे, प्राचार्य प्रकाश नवघरे, मुख्याध्यापक नितीन अवचार, ओम तांबिले, प्रदीप बुद्रुक, माधवी आसेगावकर, नितीन बोंद्रे, बंडू सीतळे, माधव जाधव, नामदेव सरकटे आदींनी शुभेच्छा व्यक्त करून पुढील कार्यासाठी यश चिंतिले.डॉ. प्रकाश अंभोरे यांच्या या सन्मानामुळे हिंगोली जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राची कीर्ती अधिक उंचावली असून त्यांच्या कार्यातून समाजाभिमुख शिक्षणाची नवी दिशा अधोरेखित झाली आहे.
.jpg)




Social Plugin