मन्सूर शहा धोत्रा. भनगोजी: ---
चिखली विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. मतदारसंघातील विकासाचा झंझावात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत करवंड येथील काँग्रेस व शिवसेना (उबाठा) गटाच्या शेकडो प्रमुख कार्यकर्त्यांनी आज भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे परिसरात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
विकासनीतीवर व्यक्त केला विश्वास
चिखली मतदारसंघात राबविल्या जाणाऱ्या धोरणात्मक विकासकामांचा धडाका पाहून प्रभावित झालेल्या कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'राष्ट्रप्रथम' धोरण आणि महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवत या कार्यकर्त्यांनी हातावर 'कमळ' बांधले आहे.
भाजपची पताका हाती घेत घुमविला विजयघोष
कार्यक्रमाच्या वेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. "चिखलीचा विकास, हाच आमचा ध्यास" अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी भाजपाची पताका हाती घेतली. या प्रवेशामुळे विरोधकांना मोठा धक्का मानला जात असून, आगामी काळात भाजपची पकड अधिक मजबूत होणार असल्याचे चित्र दिसत आहे.





Social Plugin