🌸 देवगड तालुका प्रतिनिधी अमोल शिर्के 🌸
गाव पुरळ येथे ग्रामपंचायत पुरळ मध्ये होळी सणानिमित्त कापड खेळे देव हे ग्रामपंचायत पुरळ येथे येऊन शिमगा उत्सव नाचत गाजत वाचत ढोल ताशाच्या गजरात उत्साहाने पार पाडला. अनेक स्थानिक ग्रामस्थ ग्रामपंचायतचे पदाधिकारी व मान्यवर यांच्या साह्याने शिमगा उत्सवाचे कापड खेळे देव यांचे स्वागत करून अतिशय आनंदाने कापड खेळे देव यांची पूजा अर्चना करून अतिशय उत्साहात ग्रामपंचायत पुरळ येथे साजरा केला गेला. माननीय सरपंच सौभाग्यवती अनुश्री तावडे यांच्या हस्ते कापड खेळे देव यांची पूजा अर्चना करण्यात आली. व अनेक मान्यवरांनी व स्थानिक ग्रामस्थांना सुद्धा कापड खेळे देव यांची पूजा अर्चना करून त्यांचा आशीर्वाद करून आपली गारानी सांगून श्रीफळ देऊन आपले मनोगत आपले नवस आपल्या देवापुढे मांडले गेले. असा हा शिमगा उत्सव दर सालाबाद प्रमाणे साजरा केला जातो. अनेक मान्यवर त्याची पूजा दर सालाबाद प्रमाणे केली जाते. जे गावच्या देवस्थानाचे रीती रिवाज आहेत संस्कृती आहेत त्याचप्रमाणे या कापड खेळे देव यांचे स्वागत केले जाते. त्यानंतर अतिशय भक्तीभाव व संस्कृतीला शोभणारे ढोल ताशाच्या गजरात हे कापड खेळे त्यांना सजवणारे व भूषवणारे व भक्तिभावाने त्याची पूजा करणारे ग्रामीण स्थानिक मानकरी त्याच्या स्वागतासाठी नृत्य साजरा करतात हे नृत्य बघण्यासाठी अनेक चाकरमानी स्थानिक ग्रामस्थ बघायला येतात. गाव पुरळ येथे दर सालाबाद प्रमाणे रीती रिवाजाप्रमाणे हे कापड खेळे प्रत्येक वाडी वाडी जाऊन घरोघरी जाऊन प्रत्येक तुळशीची पूजा अर्चना करतात व तेथे आपला नृत्य सादर करतात. असा हा पुरळगाव पाच गावांचा मानकरी असा आहे. या गावातले मानकरी आपापल्या परीने देवस्थानाची पूजा अर्चना करून त्यांचे काही जे देवाचे नवस असतात ते दर सालाबाद प्रमाणे पूर्ण करून आपल्या देवाला रखवालीचा साकडं घालून राजी रुजी करून दर सालाबाद प्रमाणे हा सण व्यवस्थित साजरा व्हावा ही देवापुढे प्रार्थना करतात आणि हा सण साजरा करतात. कोकणातील शिमगा हा उत्सव हा बघण्यासारखा व आनंदवर्धक व उत्साहवर्धक असा आहे एक आठवडा तरी हा सण कोकणामध्ये सर्वत्र चालतो. या सणानिमित्त घरादारात मुंबईतून प्रदेशातून विदेशातून लोक हा सण यांचे नृत्य पहावयास येतात. हे पाहण्यासारखे असते आपल्या भारतीय संस्कृतीला महाराष्ट्र संस्कृतीला शोभणारे असे असते ढोल ताशांच्या गजरात प्राचीन काळी ज्या वेशभूषा होत्या त्या परिधान करून हे नृत्य येथील ग्रामीण लोक सर्वांपुढे सादर करतात. असा हा सण ग्रामपंचायत पुरळ मध्ये अतिशय आनंदाने व उत्साहवर्धक व स्थानिक ग्रामस्थ व मानकरी व पूजेकरी यांच्या साह्याने साजरा केला जातो. अशीच भारतीय संस्कृती महाराष्ट्राची संस्कृती कोट्यांना कोटी वर्षे अशी चालावी ही ईश्वरचरणी प्रार्थना 🌸 ग्रामीण महाराष्ट्र न्यूज 🌸





Social Plugin