.jpeg)
.jpeg)

.jpeg)
श्री. ओंकार पुरी): स्थानिक उत्तमचंद बगडिया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, रिसोड येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील लैंगिक शोषण प्रतिबंधक समिती, सांस्कृतिक समिती आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. डॉ. मंगल खेडेकर यांनी भूषविले, तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनोद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाला मोलाचे मार्गदर्शन लाभले.
स्वसंरक्षण कार्यशाळा आणि कायदेविषयक मार्गदर्शन महिला दिनानिमित्त विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी पोलीस स्टेशनच्या योगिता भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष 'स्वसंरक्षण कार्यशाळा' आयोजित करण्यात आली होती. यावेळी भस्मे यांनी विद्यार्थिनींना संकटसमयी स्वतःचे रक्षण कसे करावे, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिके दाखवून मार्गदर्शन केले. तसेच, महिलाविषयक कायद्यांमधील नवीन बदलांची माहिती देत, "स्त्री ही त्याग, धैर्य आणि उज्ज्वल भविष्य घडविणारी मूर्ती आहे," असे प्रतिपादन त्यांनी केले.
स्त्री शक्तीचा जागर आणि महापुरुषांचे योगदान कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना प्रा. डॉ. मंगल खेडेकर म्हणाल्या की, "स्त्री ही केवळ सृष्टीची जननी नसून ती संस्कारांची शिल्पकार आणि समाजाला दिशा देणारी शक्ती आहे." तत्पूर्वी, प्रा. पूजा पाठक यांनी आपल्या प्रास्ताविकात स्त्रियांनी स्वतःच्या ज्ञानाचा वापर समाजाला सकारात्मक दिशा देण्यासाठी करणे, ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित केले. तसेच, एनएसएस प्रमुख प्रा. डॉ. ए. जी. वानखेडे यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'हिंदू कोड बिल'च्या माध्यमातून स्त्रियांच्या हक्कांची भक्कम पायाभरणी केल्याची आठवण करून दिली.
मान्यवरांची उपस्थिती आणि यशस्वीता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उर्मिला गिरी यांनी केले, तर प्रियदर्शनी देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. मनवर, डॉ. काळे, प्रा. प्रजापती, श्री. ओंकार पुरी, प्रा. संदीप जुनघरे, प्रा. राम जुनघरे, प्रा. राऊत, प्रा. वाघ, नरवाडे ताई आणि हिंगमिरे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी प्रा. टिकार, प्रा. डॉ. बुधवंत, प्रा. डॉ. नंदेश्वर, प्रा. डॉ. मेश्राम यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Social Plugin