Ticker

6/recent/ticker-posts

श्री नागनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर बुध मध्ये किशोरवयीन मुलींचा मेळावा संपन्न



बुध   दि . [प्रकाश राजेघाटगे ]

 एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प खटाव वडूज पंचायत समिती बुध बीटस्तरीय किशोरी जेंडर आहार आरोग्य व कायदे याविषयी प्रशिक्षण शिबीर श्री नागनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर बुध मध्ये संपन्न झाले .

सर्वप्रथम कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपस्थित मान्यवर प्रमूख पाहुणे ॲड .शुभांगी  जगदाळे ,डॉ .अक्षय तांदुळकर ,सरपंच  सुजाता बोराटे  ,प्राचार्य अंकुश भांगरे व पर्यवेक्षक नाना दडस  ,अंगणवाडी एकात्मिक बालविकास च्या सुपरवायझर संगीता काकडे  यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले .यावेळी प्रमुख पाहुणे यांचा सत्कार संगीता काकडे ,मनीषा काटकर,उज्वला माने यांच्या हस्ते करण्यात आला .यावेळी श्री नागनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर बुध मधील इयत्ता सहावी ते नववी या किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करण्यात आले . यावेळी  बुधच्या सरपंच सुजाता बोराटे  यांनी आपल्या मनोगत मध्ये मुलींमध्ये होत असलेले शारीरिक ,मानसिक व भावनिक बदल व समाजामध्ये वावरत असताना घ्यावयाची काळजी यासंदर्भात आपले मत व्यक्त केले .यावेळी ॲड . शुभांगी मदन जगदाळे यांनी लैंगिक अत्याचार व महिला व मुली विषयी असणारे विविध कायदे व त्या संदर्भाने घ्यावयाची मुलींनी काळजी याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले .मुलींनी आत्मविश्वासाने येणाऱ्या अडचणींना सामोरे गेले पाहीजे . भारतीय संविधाने कायदयाने मुलींना  संरक्षण दिल आहे याबद्दल जनजागृती केली . तसेच सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आज सर्व क्षेत्रात मुली प्रगती करत आहे याविषयी माहिती दिली डॉ . अक्षय तांदुळवाडकर यांनी  आधुनिक जीवनशैलीमुळे मुलींमध्ये शारीरिक बदल सर्वसाधारण 7 - 8 व्या  वर्षापासूनच होत चाललेले पाहायाला मिळत आहेत.शारीरिक बदल होत असताना आपल्या शरीरांतर्गत विविध प्रकारची संप्रेरके हार्मोन्स निर्माण होत असतात आणि त्यामुळे मुलींमध्ये व मुलांमध्ये बदल झालेले पाहायला मिळतात . तसेच भावनिक व मानसिक बदलही या किशोरवयीन मुलींमध्ये पाहायला मिळतात त्यामुळे या वयोगटातील मुलींनी आपल्या दैनंदिन जीवनात घडत असलेल्या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे . तसेच आहारामध्ये योग्य पोषक तत्वे शरीराला आवश्यक असणारे घेणे गरजेचे आहे . फास्ट फूड शक्यतो टाळला पाहिजे व आहारात सर्व प्रकारच्या पालेभाज्या फळे व जीवनसत्व कर्बोदके, प्रथिने यांचा समावेश होईल असे खाद्यपदार्थ समाविष्ट करणे गरजेचे आहे . त्यामुळे शरीराची जडणघडण योग्य रीतीने होते .वैयक्तिक स्वच्छता देखील खूप महत्त्वाची आहे .या संदर्भात देखील सविस्तर असे मार्गदर्शन केले. तसेच सुपरवायझर संगीता काकडे  यांनी देखील मुलींना आहार , आरोग्य व कायदे याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले व त्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्यावर चर्चा केली .

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प खटाव वडूज यांच्या वतीने विद्यार्थिनींना आवश्यक ते साहित्य देण्यात आले .यावेळी अंगणवाडी सेविका  मनीषा अरुण काटकर ,प्राजक्ता दीपक सूर्यवंशी, उषा अविनाश जगदाळे, वंदना दीपक ठोंबरे, मनीषा संजय घाटगे  ,सुवर्णा सुनिल पात्रेकर ,नंदा मल्हारी जाधव,सुनिता विजय सुर्यवंशी , उज्वला यशवंत माने, माधुरी राजेंद्र जाधव ,साधना अभिजीत घाटगे उपस्थित होत्या तसेच विद्यालयातील सहशिक्षिका चंदा वाईकर,पल्लवी कुंभार  ,सानिका बुधावले, रेशमा दरेकर ,माया पाटोळे व बोराटे मॅडम उपस्थित होत्या .यावेळी विद्यालयातील सहशिक्षक श्री भगवान सरवदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार मानले . यशस्वीरित्या हा कार्यक्रम संपन्न झाला .यासाठी सुपरवायझर संगीता काकडे व अंगणवाडी अंगणवाडी सेविका यांचे खूप सहकार्य मिळालेविद्यालयातील शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य दिले .