Ticker

6/recent/ticker-posts

हिप्परगा थडी येथील रोजगार सेवकाचा मनमानी कारभार, ग्रामपंचायतीचे त्याकडे दुर्लक्ष.



राजेश आमेटवार

ग्रामीण प्रतिनिधी : बिलोली

बिलोली - राज्यात सुरु असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची जबाबदारी गावपातळीवर सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकार्‍यांवर देण्यात आली आहे. या कामात ग्रामपंचायत स्तरावर अभिलेख आणि नोंदवह्या ठेवण्यासाठी मदत करण्याची आणि प्रत्यक्ष काम करण्यासाठी ग्रामरोजगार सेवकांची अर्धवेळ स्वरूपात नियुक्ती करण्यात आली आहे.ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेंतर्गत होणार्‍या वैयक्तीक लाभासह सार्वजनिक कामांचा लेखाजोखा व समन्वयक म्हणून ग्राम रोजगार सेवक आपली कामिगरी बजावत आहेत.तसेच मनेरगा मार्फत शेतकरी बांधवांसाठी शासनाणाकडून काही प्रमाणात सबसिडी आणि अनुदान स्कीम मार्फत लागणारे साहित्य जसे की तुषार, ठीबक सिंचन, शेततळे बांबू लागवड, शोषखडे अशा प्रकारे मेंढी पालन, शेळीपालन,गुरांसाठी शेड असे अनेक योजना मनेरगामार्फत चालवले जातात असे असताना गावातील काही ठराविक लोकांनाच याबद्दल रोजगार सेवक माहिती देण्याचे आरोप गावकऱ्यांनी करत आहेत. रोजगार सेवक ग्रामपंचायत मध्ये न येता घरूनच कामे करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.असे असतानाच या मनेरगा कार्डचे केवायसी करण्यासाठी दि. ५ मार्च २०२६ रोजी गावातील १०० ते १२५ लोकांचे केव्हाची साठी नावे असल्याचे यादी गावातील एका व्हाट्स अप ग्रुप वर टाकण्यात आले. ज्यांचे नावे नाहीत त्यांना करण्याची आवश्यकता नाही असे मनने आहे.मग त्यांची नेमके काय कारण असतील हे समजणे महत्वाचे आहे. कारण आज २० वर्षांपासून त्या जॉब कार्ड ची गरज लोकांना भासली नाही. मग त्यांची kyc झाली असे ग्रहीत धरायचे का ? त्यातील काही लोकांना व्हाट्सअप म्हणजे काय हेच माहित नाही मग त्यांच्या पर्यत ही माहिती कसे पोहचेल अशी विचारणा रोजगार सेवकास केले.आज काल सर्वेजन हुशार आहेत कोणाला सांगायची काही गरज नाही अशा प्रकारे त्यांचे म्हणणे आहे एवढेच नसून यामध्ये देखील जे कोणी त्यांच्या संबंधातील,नात्यातील, जवळीक अश्या व्यक्तींच्या घरी जाऊन वैयक्तिक केवायसी करत असल्याचे निदर्शनात येत आहे बाकीच्यांच्या घरी येऊन का करत नाही असे विचारल्यास तुम्ही माझ्या घरी येऊन केवायसी करून घ्यावे. कारण घरोघरी जाऊन काम करण्याची जबाबदारी माझी नाही असे ग्राम रोजगार सेवक म्हणत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी करत आहेत. मग गावातील बरेच लोकांच्या घराचे काम पूर्ण झाल्याचे दिसून येत आहेत. मग नंतर जी रोजगार मनून शासनाकडून ३० हजार रुपये मिळत असतात त्यासाठी देखील वरिष्ठठांना टक्केवारी द्यावी लागते असा सवाल उपस्थित होत आहे.जर नागरिकांनी नाही दिले तर तुमची कालावधी संपली असे कारण सांगत टाळाटाळ करत असल्याचे नागरिकांचे मनने आहे.मग याची प्रकीया कधी करावी हे सांगत नसल्याने हातचे पैसे जात आहेत.मग ग्रामरोजगार सेवक असे मनमानी आपले नियम चालवत असेल तर याकडे सरपंच व ग्रामसेवकांनी लक्ष का घालत नाहीत याबद्दल गावातील नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे जर असेच डोळ्या मागे डोंगर चालत असल्यास गोरगरीब जनतेला शासनाच्या विविध उपक्रमापासून वंचित राहण्यास जबाबदार कोण आहे यावर मोठा प्रश्न उपस्थित होतो अशा या मनमानी कारभाराला बसवण्यासाठी त्वरित सरपंच व ग्रामसेवकांनी तातडीची बैठक घेऊन यावर तोडगा काढावे कारण ग्राम रोजगार सेवक हा शासनाकडून येणारे मनरेगा मार्फत येणारे योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम करत असतो. यावर काही निर्णय न घेतल्यास ग्रामरोजगार सेवकावर सरपंच व ग्रामसेवक काही तरी उपाय काढतील काय अशी कुजबुज गावातील नागरिकांमध्ये होत असल्याचे दिसून येत आहे.