Ticker

6/recent/ticker-posts

पुसेगावमध्ये कचऱ्याची होळी... लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित.



 बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

पुसेगाव येथील कचऱ्याचा आणि प्रलंबीत रथमार्गाचे काम यासाठी छत्रपती शिवाजी चौकात कचऱ्याची होळी करण्यात आली . यावेळी आंदोलकांना गुरुवारपर्यंत कचऱ्याची सोय करण्यात येईल , असे आश्वासन दे०यात आले . तसेच रखडलेले काम त्वरीत सुरू केल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले .   सातारा जिल्ह्यात सुप्रसिद्ध श्री सेवागिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुसेगाव नगरी विविध समस्याने ग्रासलेली आहे . गावातील प्रतिनिधींची उदासीनता व प्रशासनाचा भोंगळ कारभार ,कचऱ्याचे मोठे ढीग  रस्त्याला पडले आहेत ,रथ मार्गाचे रखडलेले काम ,पाणी योजनेचा झालेला खिळखिळाट   व ग्रामपंचायत वर अजूनही नेमणूक न झालेला प्रशासक,     या गोष्टीमुळे गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले .छत्रपती शिवाजी चौकात प्रताप जाधव यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत गावातील प्रमुख लोकप्रतिनिधीनी उपस्थिती दर्शवली . कचऱ्याचा ढीग जाळून यावेळी निषेध केला . यावेळी ग्रामपंचायत अधिकारी नागरगोजे  , पीडब्ल्यूडी अधिकारी व प्रशासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते . यावेळी युवा नेते व देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त गौरव जाधव, विश्वस्त सचिन देशमुख, बाजार समिती सदस्य गणेश जाधव ,रयत संघटनेचे अध्यक्ष संदीप भैया जाधव, ईगल ग्रुपचे अध्यक्ष सुसेन जाधव , विशाल पाटील मराठा सेवा संघाचे  दीपक तोडकर, महिला आघाडी सुमित्रा शेडगे ,राष्ट्रवादी शहर प्रमुख बाळासाहेब जाधव , निलेश जाधव प्रकाश जाधव, पुसेगाव शिवसेना शहर प्रमुख आकाश जाधव ,सचिन गवळी ,शेतकरी संघटना तालुकाप्रमुख पवार, प्रवीण नाना देवकर, ग्रामपंचायत सदस्य सत्यम जाधव, माजी सैनिक संघटना अरुण जाधव ,मानसिंग सावंत, तोडकर मेजर, प्रवीण जाधव सामाजिक कार्यकर्ते धीरज जाधव, वाहतूक संघटनेचे जिल्हाध्यक्ष  किशोर जाधव,  रोहित जाधव, रवींद्र विधाते ,अमोल जाधव, सुशांत शेडगे, दादा घाडगे सचिन जाधव, सचिन गवळी, संजय पवार सर, अजय जाधव मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते . प्लास्टिक मुक्त पुसेगाव, स्वच्छ सुंदर पुसेगाव, कर वसुलीसाठी लावलेला तगादा ,सुविधा वंचित असलेले ग्रामस्थ, असल्या खोट्या आश्वासनापेक्षा प्रशासनाने गावातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला असून दोन ते तीन महिने झालं कचरा प्रश्न मिटलेला नाही .रस्त्याच्या चारी रोडला कचऱ्याचे मोठमोठे ढिग  पडलेले आहेत .धुराचे लोट कायम चालू आहेत . मागील महिन्यात अशीच एक महिला कचरा टाकण्यासाठी गेली असतात तिचा अपघाती मृत्यू झाला यास जबाबदार  ? संबंधित जबाबदार अधिकाऱ्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा,  रथ मार्गाचे काम पूर्ण रखडलेले आहे .मोठे  खड्डे काढून रथ मार्गाचे काम प्रलंबित पडले आहे . पिण्याच्या पाण्याचीही काम बेभरोशाचे झाले आहे . या सर्व विषयावर ग्रामस्थ आक्रमक झाले होते .गुरुवारपर्यंत कचरा व्यवस्थापन वाहतूक सुरू करू व रथमार्गाचे काम ही गतीने एक महिन्याच्या आत पूर्णत्वास करू अशी लेखी हमी अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले . यावेळी पुसेगाव पोलीस स्टेशनचे सपोनि संदिप पोमण  यांनी चोक बंदोबस्त ठेवला .