गुणवंत राठोड कारंजा (प्रतिनिधी) –.
जिल्हा परिषद वाशिमच्या शिक्षण विभाग आणि स्काऊट गाईड कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २४ मार्च रोजी सौ. सुशीलाताई जाधव विद्यालय, सोनखास (ता. वाशिम) येथे आयोजित १२ व्या जिल्हा स्काऊट-गाईड मेळाव्यात जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा वापटी कुपटीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेत विद्यार्थ्यांनी एकूण दहा पैकी पाच पारितोषिके मिळवत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला.
कारंजा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या या शाळेतील गाईड युनिटने मुख्याध्यापक श्री सुनिल मुंदे, स्काऊट शिक्षक श्री रुपेश किन्हीकर,गाईड कॅप्टन कु. मीना अनासाने , स्काऊट गाईड स्वयंसेविका कु. आचल काळेकर व कु.गायत्री ठाकरे व शिक्षक वृंद श्री अशोक ताथोड , श्री अजय शंकर पुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मेळाव्यात सहभाग नोंदविला.
मेळाव्यातील सहभागी विद्यार्थिनींमध्ये कु. पायल चव्हाण,कु. अंकिता शेजव,कु. गौरी महल्ले,कु. पंकुडी मोरे,कु. आस्था खरडे,कु. गौरी भुतेकार,कु. पूजा चव्हाण,कु. क्रिष्टी शिरसाट ,कु.साक्षी चव्हाण,कु. श्रद्धा रोकडे, कु. मंजी चव्हाण, कु. साची गायकवाड, कु. संध्या चव्हाण,कु.पलक शेजव कु. श्रद्धा आदी गाईड विद्यार्थिनींनी
मेळाव्यातील विविध स्पर्धांमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत स्काऊट-गाईड प्रदर्शनी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. तसेच बँड पथक स्पर्धेत द्वितीय क्रमांक, पथसंचलन स्पर्धेत द्वितीय क्रमांक , तंबू सजावट प्रथम क्रमांक, मनोरे स्पर्धा द्वितीय क्रमांक व एक प्रोत्साहनपर पारितोषिक मिळवत एकूण पाच बक्षिसांवर आपली मोहोर उमटवली.
मेळाव्याच्या उद्घाटन व समारोप समारंभास शिक्षणाधिकारी (योजना) श्री विठ्ठल भुसारे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजेंद्र महाजन, स्काऊटचे जिल्हा संघटक के. एल. पवार, सौ. सुशीलाताई जाधव विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत जोशी, विवेकानंद विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब गोटे, पंडित नेहरू विद्यालयाचे प्राचार्य गिरी, जगदंबा विद्यालय भामदेवीचे मुख्याध्यापक रवींद्र राठोड, वसंत विद्यालय पोहा प्राचार्य विठ्ठल भुसारे, जय बजरंग विद्यालय सुकंडाचे मुख्याध्यापक सुमेध तायडे, विदर्भ माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे सहसचिव विजय भड आदी मान्यवर उपस्थित होते.
समारोप प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते गाईड विद्यार्थीनीसह स्काऊट शिक्षक व मुख्याध्यापक सुनील मुंदे यांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावर्षी प्रथमच सहभाग नोंदवूनही शाळेने मिळवलेले हे यश उल्लेखनीय ठरले आहे. या कामगिरीबद्दल शाळा
व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय खरडे , संचालक मंडळ, गावकरी, पालक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.





Social Plugin