Ticker

6/recent/ticker-posts

दोन दशकांनंतर जुळले मैत्रीचे धागे; २००३ बॅचचा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न



लकी राठोड

शालेय जीवनातील सोनेरी आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि जुन्या मित्र-मैत्रिणींच्या भेटीचा आनंद लुटण्यासाठी जिल्हा परिषद हायस्कूल येथील २००३ सालच्या १० वीच्या बॅचचा स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. तब्बल २३ वर्षांनंतर एकत्र आलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात पुन्हा एकदा बालपणीचा आनंद अनुभवला.२००३ च्या बॅचमधील विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत – कोणी डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक तर कोणी यशस्वी उद्योजक म्हणून कार्यरत आहेत. मात्र, या मेळाव्यात सर्वजण आपले हुद्दे विसरून पुन्हा एकदा 'बॅचमेट' झाले होते. एकमेकांच्या सुख-दुःखाची विचारपूस, बालपणीच्या गमतीजमती आणि शिक्षकांकडून मिळालेला ओरडा यावर झालेल्या गप्पांनी वातावरणात चैतन्य भरले होते.कार्यक्रमाच्या उत्तरार्धात जुन्या गाण्यांवर ठेका धरत विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. स्नेहभोजनानंतर सर्वांनी सामूहिक फोटो काढले आणि 'पुन्हा लवकरच भेटू' या आश्वासनाने जड अंतःकरणाने एकमेकांचा निरोप घेतला.