प्रतिनिधी
@ रामेश्वर तोंडे लोणी गवळी
देऊळगाव राजा:-नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरम यांच्या वतीने देण्यात आलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार आज दिनांक 23 मार्च2026 रोजी शाळेचे प्राचार्य श्री आर. बी. कोल्हे, उपप्राचार्य श्री बंड सर ,पर्यवेक्षक श्री जाधव सर तसेच ज्येष्ठ शिक्षक श्री मुळे सर उपस्थित होते . आपल्या मनोगतामध्ये श्री राठोड सरांनी आतापर्यंत 30 वर्षे सेवा केली आणि स्काऊट गाईड मध्ये आतापर्यंत 28 मुलं राज्य पुरस्कार केले , विविध उपक्रमांतर्गत साक्षरता अभियान ,व्यसन मुक्ती निर्मूलन, प्रभात फेरी द्वारे जनजागृती केली . संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष, कोषाध्यक्ष ,सचिव, संचालक तथा सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले ,या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्री पेरणे सर यांनी केले.





Social Plugin