Ticker

6/recent/ticker-posts

एम एस आर डी सी मेहकर वाले साहेब आम्ही गरीब लोक आहोत आम्हाला पण जीव आहे मेहकर सुलतानपूर रस्त्यावरच्या भेगा बुजवा हो,,,,



प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी

मेहकर - मेहकर सुलतानपूर नॅशनल हायवेवर भयंकर मोठ्या भेगा पडल्या आहेत ह्या भेगा गेल्या अनेक वर्षापासून आहेत अनेकांचे जीव या भेगांमध्ये अपघात होऊन गेलेले आहेत मात्र संबंधित विभागाकडून ठोस अशी उपाययोजना कोणतीच करण्यात आलेली नाही गोरगरिबांचे दररोज अपघात होत आहेत.

 कोट्यावधी रुपये खर्च झाले आहेत मात्र मेंटेनन्सचा काही ताळमेळ नाही  तरीसुद्धा एम एस आर डी सी वाल्या साहेबांनी ताबडतोब या भेगा बुजवाव्यात अशी कळकळीची व आग्रहाची विनंती गोरगरीब वाहनधारक करत आहेत मात्र काही असले तरी परिस्थिती अतिशय बिकट आहे कोणाचाही वचक अधिकाऱ्यावर राहिलेला नाही