Ticker

6/recent/ticker-posts

लोणार तालुक्याला गारपिटीचा फटका.



प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी

बुलढाणा: लोणार  तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने आज १९ मार्च रोजी दुपारी जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह गारपीट झालेल्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले. तालुक्यातील वझर आघाव, कासारी, येवती, चिंचोली सांगळे, पारडा दराडे, देऊळगाव कुंडपाळ, खुरमपूर, अजितपुर, धायफळ या भागात प्रचंड प्रमाणात त पाऊस व गारपीट झालेली आहे.