बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग आणि गावखेडा ऍग्रो फार्म & टुरीझम यांच्या सौजन्यानेशेतकऱ्यांच्या एकात्मिक गावखेडा ब्रँडच्या माध्यमातून देशी अंडी उत्पादन आणि स्वतःचे विक्री व्यवस्थापन मार्गदर्शन शिबीर कार्यक्रम सातपुता वस्ती राजापूर येथे पार पडला..
गावठी अंडी अधिक पौष्टिक असतात आणि त्यात सामान्य अंड्यांपेक्षा जास्त पोषणमूल्य असते . याबरोबर उच्च मागणी आणि तुटवडा असा तुटवडा कायमस्वरूपी असतो.कोरोना काळानंतर आणि आरोग्य जागरूकतेमुळे गावठी अंड्यांची मागणी वाढली आहे, मात्र पुरवठा कमी असल्याने अनेकदा तुटवडा जाणवतो.
गावठी अंड्याची वाढती मागणी बघता ग्रामीण भागात १० रुपये प्रति अंडे असा दर मिळतो, तर शहरात हा दर अधिकचा म्हणजे पंधरा ते वीस रुपये मिळतो. तसेच देशी कोंबड्या मोकाट (मुक्त संचार) पाळल्या जातात, ज्यामुळे त्यांची अंडी अधिक सेंद्रिय मानलीजातात,ग्रामीण आणि शहरी भागातील देशी अंड्याची मागणी पाहता पुरवठा अगदी नगण्यच आहे.
यासाठी यावर व्यावसायिक संधीचा विचार करता शेतकऱ्यांच्या एकात्मिक गावखेडा ब्रँडच्या माध्यमातून देशी अंडी उत्पादन आणि स्वतःचे विक्री व्यवस्थापन मार्गदर्शन शिबिर राजापूर, सातपुता वस्ती येथे पार पडले . या कार्यक्रमासाठी उत्तर खटाव पंचक्रोशीतील शेतकरी याबरोबर महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग अधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून श्री सी जी अपशिंगे सेवानिवृत्त सह आयुक्त पशुसंवर्धन, श्री विक्रम वाघमोडे तालुका कृषी अधिकारी खटाव, श्री अक्षय सावंत मंडल कृषी अधिकारी पुसेगाव, गावखेडा संस्थापक श्री अजित दिडके, लेखक श्री अमृतराव काळोखे सर, ज्येष्ठ पत्रकार श्री प्रकाश राजेघाटगे, सामाजिक कार्यकर्ते श्री दशरथ घनवट,श्री संतोष शिंदे उप कृषी अधिकारी पुसेगाव, व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री रविराज लाड माजी सरपंच डिस्कळ उपस्थित होते.
.jpg)




Social Plugin