Ticker

6/recent/ticker-posts

सुरंगली येथे जागतिक पाणी दिन साजरा तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे यांचे शेतकऱ्यांना मोलाचं मार्गदर्शन



।भोकरदन प्रतिनिधी संजीव पाटील।

 सुरंगली येथे जागतिक पाणी दीन साजरा  भोकरदन तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे  यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन पाण्याचे संवर्धन करण्याचे आवाहन।प्रतिनिधी संजीव पाटील। भोकरदन तालुका प्रतिनिधी । दिनांक 22 मार्च 2026 रोजी सुरंगली तालुका भोकरदन जिल्हा जालना येथे जागतिक पाणी दिवस  ISAP इंडिया फाऊंडेशन व PRIF यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच समृद्ध शेतकरी प्रकल्पा अंतर्गत साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मा. श्री अमोल शिंदे सर तालुका कृषी अधिकारी भोकरदन व  उषा उबाळे मॅडम कृषी सहाय्यक उपस्थित होत्या तसेच ISAP इंडिया फाऊंडेशन चे रिजनल मॅनेजर श्री लक्ष्मीकांत दुधगावकर उपस्थित होते.  गावातील उद्योजक श्री. योगेश जाधव कार्यक्रमाला उपस्थित होते आज जागतिक पाणी दिवसानिमित्त शेतकऱ्यांना पाणी संवर्धन व सध्या वातावरणामध्ये होत असलेल्या बदलांमुळे पीक पद्धती तसेच पाणी संवर्धन पध्दतीत बद्दल करणे आवश्यक आहे पाणी संवर्धन करण्यासाठी ठिबक सिंचन वापर करणे, शेतामध्ये CCT DCT, बांध बंदिस्त केली पाहिजे जेणेकरून आपल्या जमिनीची होत असलेली धूप कमी करता येऊ शकते, तसेच शासकीय योजनांची माहिती दिली तसेच शासनाने विकसित केलेल्या महाविस्तार AI एप्लिकेशन्स चां वापर करून पीक व पाण्याचे नियोजन करावे असे आवाहन मान श्री अमोल शिंदे सर तालुका कृषी अधिकारी यांनी केले. 

तर लक्ष्मीकांत दुधगावकर यांनी ISAP इंडिया फाऊंडेशन च्या वतीने राबवत असलेल्या समृद्धी शेतकरी प्रकल्पा बद्दल माहिती दिली प्रामुख्याने नवनवीन तंत्रज्ञान वापरून ISAP इंडिया फाऊंडेशन आणि PRI फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू केलेल्या अवजार बँकेची माहिती दिली प्रामुख्याने बीज नाशक फवारणी करण्यासाठी बूम स्प्रेअर चा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी त्याचा वापर करावा व मक्का थ्रेशिंग करण्यासाठी मक्का थ्रेशर चा सुद्धा जातीत जास्त शेतकरी बांधवांनी त्याचा फायदा घ्यावा जागतिक पाणी दिवसानिमित्त शेतकऱ्यांना आवाहन केले. 

तसेच गावातील युवा उद्योजक श्री योगेश जाधव यांनी स्वतःच्या शेतामध्ये केलेले नवनवीन प्रयोग करून कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन कसे घ्यावे तसेच माती परीक्षण किती आवश्यक आहे त्याचे महत्त्व आज जागतिक पाणी दिवसानिमित्त शेतकऱ्यांना पटवून सांगितले. ISAP इंडिया फाऊंडेशन चे जिल्हा कॉर्डिनेटर श्री सिद्धार्थ गवई यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचलन व आभार प्रदर्शन केले. तसेच जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी शेतकरी समृद्धी प्रकल्पा अंतर्गत स्थापन केलेल्या शिवमका शेतकरी उत्पादक कंपनी चे सभासद व्हावे व या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे आयोजन श्री योगेश बुलगे (जालना जिल्हा कॉर्डिनेटर) यांनी केले तर जागतिक पाणी दिवसानिमित्त जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या प्रकल्पामध्ये सहभागी व्हावे असे प्रतिपादन केले. 

तसेच कार्यकमाला  श्री  सतोष काळे उपस्थित होते . उपास्थित शेतकरी बांधवांना मातीपरीक्षण प्रमाणपत्र तालुका कृषी अधिकारी श्री अमोल शिंदे सर, लक्ष्मीकांत दुधगावकर, उषा उबाळे यांच्या हस्ते माती परीक्षण प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.  कार्यक्रमाला उपस्थित ISAP इंडिया फाऊंडेशन ची टीम भाऊसाहेब काळे, राजेंद्र धनवई, प्रमोद सोनवणे, भास्कर दौड, विनोद जयस्वाल, किरण लांडगे, प्रवीण पन्हाळे, रामेश्वर लाड, तसेच मोठ्या संख्येने गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.