Ticker

6/recent/ticker-posts

ए आय च्या विश्वात मानवी संकल्पना टिकवून ठेवणे ही काळाची गरज : डॉ ए जी मुळीक .



बुध   दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

यापुढच्या काळात सावध भूमिका घेणे समाजातील सर्वांनाच क्रमप्राप्त आहे.तुम्हांला एखाद्या विषयावर माहिती पाहिजे का फोटो,भाषण करायचं, चित्र डिझाइन करायचं असो की अन्य काही ही मागा ,'ए आय' काही सेकंदांत उत्तर तयार करतो. त्या प्रणालीने लिहिलेला तो मजकूर इतका स्पष्ट, नीटनेटका, संतुलित असतो की तो माणसाने लिहिलेला आहे की, मशीनने हे ओळखणं कठीण होतं; पण तरीही, काहीतरी सूक्ष्म वेगळंपण नक्कीच जाणवतं. शब्द बरोबर असतील, विचार व्यवस्थित असतील; पण त्यात मानवी भावना,संवेदना, जाणीव,ऊब, एखादी अस्सल छटा नक्कीच कमी असणार नाही. त्यामुळे ए आय च्या विश्वात मानवी संकल्पना समाजातील प्रत्येक घटकाने टिकवून ठेवणे ही काळाची गरज ठरणार आहेअसे प्रतिपादन कराड च्या स गा. म. महाविद्यालयाचे डॉ ए जी मुळीक यांनी केले.

   खटाव येथील शहाजीराजे महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या निमित्ताने अग्रणी महाविद्यालय आणि विज्ञान मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

    यावेळी प्राचार्य प्रोफेसर डॉ जे पी कदम,विज्ञान मंडळाचे अध्यक्ष प्रा राजेंद्र खराडे, डॉ ए एम येलपले, प्रा सौ पी बी कांबळे,प्रा एस आर आत्तार , डॉ रानमळे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख,प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचारीउपस्थित होते.

यावेळी प्रा मुळीक यांनी ए आय चे समाजाच्या दृष्टिकोनातून भविष्यातील फायदे व तोटे सविस्तर उदाहरणासह स्पष्ट केले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील अशी ए आय ची काही अँप डॉ मुळीक यांनी दिली. दरम्यान महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विज्ञान दिनाच्या निमित्ताने तयार केलेल्या पोस्टरचे आणि वैज्ञानिक प्रयोगांचे प्रदर्शन भरवण्यात आले. याला आसपास च्या शाळेतील मुलांनी भेट देऊन वैज्ञानिक प्रयोगांचा आनंद घेतला. प्राचार्य प्रोफेसर डॉ जे पी कदम यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु स्वरा माने हीने तर प्रा एस आर आत्तार यांनी परिचय आणि डॉ येलपले यांनी प्रास्ताविक व प्रा सौ पी बी कांबळे यांनी आभार मानले