उदगीर / प्रतिनिधी
दि. १ मार्च रविवार रोजी जेष्ठ वैज्ञानिक सी.व्ही.रमण यांच्या स्मृती प्रित्यर्थ विज्ञान दिनाचे आयोजन रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान उदगीर च्या वतीने राज्यस्तरीय विज्ञान प्रयोग व प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर द्वारा संचलित जिजामाता विद्यालय तोंडचिर यांचे तथा विद्यार्थ्यांचे यशस्वी विज्ञान प्रयोग व प्रदर्शन स्पर्धेचे प्रयत्नाचे कौतुक करण्यात आले. या उपक्रमासाठी मुख्याध्यापक विल्यम प्रधान सर, विज्ञान शिक्षिका सौ.के.व्ही.दाडगे मॅडम, उत्कृष्ट मार्गदर्शिका शिक्षिका सौ.गिरी एस.पी. मॅडम, शिक्षिका सौ.शितल गिरी-आरणे मॅडम व इतर शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली होती. विद्यार्थ्यांच्या तयारीत शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले. विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या संख्येने विज्ञान तज्ञ, विकसित तंत्रज्ञान आणि शैक्षणिक उच्च स्तरावर काम करणारे तंत्रज्ञानी, पालक, विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, प्रतिनिधी उपस्थित होते. पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नाचे कौतुक करत. अशा उपक्रमाचे स्वागत केले. एकूणच या विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला असून शैक्षणिक दृष्टिकोन विकसित होण्यास मोठी मदत झाली आहे. याबद्दल किसान शिक्षण प्रसारक मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष, सदस्य व पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुक केले.






Social Plugin