यशवंत पवार कन्नड
निर्मळ,नितळ, निर्मोही, निरपेक्ष, निर्भीड, निश्चयी आणि नि:स्वार्थी ही विशेषणे ज्यांच्या व्यक्तिमत्वाचा स्थायीभाव आहे, ते मानसिंगराव बाळासाहेब पवार अर्थात बापूसाहेब म्हणजे एक असे नाव आहे की ,ते आपल्यातल्या आपल्यात एक मोठ्ठे हे गाव आहे. उद्योजक, समाजकारणी, शिक्षणप्रेमी म्हणून बापूसाहेब मोठे आहेतच, पण ते एक सुसंस्कृत सहृदयी माणूस म्हणूनही तितकेच मोठे आहेत .
व्यक्तिगत व सामाजिक जीवनात बापूसाहेब उच्चकोटीची जीवनमूल्य आचरणात आणतात, जपतात .बापूसाहेब खूप शिस्तप्रिय व्यक्तिमत्व आहे .ज्या ज्या शैक्षणिक, व्यापारी सामाजिक, औद्योगिक संस्थांशी त्यांचा संबंध आहे ,तिथे बापूसाहेब लोकशाही मूल्यांची जपणूक करतात.शिस्तबद्ध व पारदर्शक कामाची कार्यसंस्कृती त्यांनी त्या सर्व संस्थांमध्ये रुजवली व विकसित केले आहे. त्यामुळे बापूसाहेबांच्या दूरदर्शी दृष्ट्या व कर्तव्यनिष्ठ कार्यशैलीमुळे त्या संस्थांच्या वाढ व विकासास मोठी चालना मिळाली आहे.
कन्नडच्या श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक मानसिंह बाळासाहेब पवार यांनी सकारात्म, नि;स्वार्थी आणि विधायक दृष्टीने संस्थेला दर्जेदार भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता याबाबतीत एका उंचीवर नेऊन ठेवले आहे.
अलीकडे महाराष्ट्रात कॉपी मुक्तीची चर्चा सुरू आहे. त्याच्या कितीतरी आधीपासून म्हणजे साधारण सन 2005 पासून त्यांनी स्वतःहून संस्थेच्या शाळा आणि महाविद्यालयात कॉपी मुक्त परीक्षा घेतल्या आणि ते कॉपी मुक्तीचे व्रत ही शिक्षण संस्था निष्ठेने पाळत आहे.
श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून सन २००८ या वर्षी कन्नड तालुका महोत्सवाचे आयोजन करून एक मोठा ज्ञान यज्ञ त्यांनी कन्नडच्या मातीत घडवून आणला. या महोत्सवाच्या माध्यमातून कितीतरी विद्यार्थी व युवकांना पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली .
आज छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था शैक्षणिक विकासाच्या बाबतीत आपल्या कक्षा रुंदावत आहे. आदरणीय मानसिंह बाळासाहेब पवार अर्थात बापूसाहेबांच्या प्रयत्नांचे गौताळा व्हॅली स्कूल ही कन्नड तालुक्यातील पहिली सीबीएसई शाळा सुरू झाली आणि आज ही शाळा प्रगतीपथावर आहे.
शिवाजी महाविद्यालयाच्या माध्यमातून सुरू असलेले संगणक विषयाचे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी शिक्षणाची उत्तम सोय आहे.
श्री शिवाजी फार्मसी कॉलेजच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांची संधी कन्नडमधील विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहे. आदरणीय साहेबाच्या प्रयत्नाने संस्थेचे आयटीआय कॉलेज सुरू होत आहे.
कन्नड मधील आपल्या राहत्या घरी सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून व्रतस्थपने चालवत आहेत. आज या वाचनालयाची पाच भव्य इमारत आहे. मोठी ग्रंथसंपदा, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, ई ग्रंथालय यासोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी IOT Lab सुरू करण्यात आली आहे. विज्ञान प्रयोग शाळा, अष्ट्रोनामी लॅब येथे साकारल्या आहेत.
या सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालयांच्या माध्यमातून कन्नड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये फिरते वाचनालय चालविलेले जाते. आज गावाखेड्यातील शेकडो विद्यार्थी या फिरत्या वाचनालयाचे वाचक आहेत.
कन्नड तालुक्यातील विद्यार्थी कलावंताना व्यासपीठ मिळावे म्हणून दरवर्षी सहकार महर्षी बाळासाहेब पवार संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांना चांगले संस्कारक्षम आणि प्रेरणादायी चित्रपट सहकार महर्षी बाळासाहेब पवार फिल्म फेस्टिवलच्या माध्यमातून दाखवले जातात. AI पासून ते शेती पर्यंत अशा विविध विषयावर दरवर्षी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते.
आदरणीय बापूसाहेब हे उत्तमत्वाचा आणि उत्कृष्टतेचा ध्यास असणारे सरळ साधे व्यक्तिमत्व. जे जे काय चागले आहे ते ते कन्नड साठी करायचे ही त्यांची प्रामाणिक इच्छा असते. हे सर्व करताना श्रेयापासून नामा निराळा रहाण्याचा निस्वार्थी स्वभाव हा माझ्यासारख्या युवकांना प्रेरणा देणारा आहे.-डॉ रूपेश चिंतामणराव मोरे.शिक्षण अभ्यासक





Social Plugin