बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
बुध ता . खटाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे जेष्ठ सल्लागार कै . माणिक आप्पाजी घाडगे यांच्या पुण्यानुमोदनाच्या कार्यक्रमा निमित्त १०१ विविध प्रकारची झाडे लावून आदरांजली वाहिली . धम्म उपासक डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान बुधचे सचिव मंगेश घाडगे ,धम्म उपासक मनिष घाडगे कोषाध्यक्ष, खजिनदारअमोल खरात, सह सचिव सचिन खराटे, अध्यक्ष मुरलीधर खराटे, उपाध्यक्ष चंद्रकांत खराटे, कार्याध्यक्ष सुरेश खराटे, उप कार्याध्यक्ष धनंजय खराटे डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे सर्व उपस्थित कार्यकर्ते धम्म बांधव,उपासिका यांच्या संकल्पनेतून माणिक अप्पाजी घाडगे यांना १०१ विविध प्रकारची झाडें लावून वृक्ष रोपण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने आगळी वेगळी आदरांजली देण्यात आली.
कै . माणिक आप्पाजी घाडगे यांच्या पावन स्मृतीना हिरव्या वनराईत पशुपक्षांच्या कलरवमध्ये स्मृती उद्यानाच्या माध्यमातून त्यांची रक्षा झाडांना विसर्जित करण्यात आली. तरी सर्व धम्म बांधव, आपतेष्ट ,नातेवाईक यांनी प्रेमाखातर वृक्ष भेट आणून तिचा स्वीकार करून पुण्यानुमोदना निमित्त वृक्ष रोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे उपाध्यक्ष चंद्रकांत खराटे, सचिन खराटे यांनी सर्व धम्म बांधव यांचे उपक्रम यशस्वीरित्या संप्पन्न केल्या बद्दल सर्वांचे कौतुक केले.असेच वेगवेगळे उपक्रम प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करावेत . समाजाच्या प्रति देशाच्या प्रति आपली बांधिलकी जोपासावी असे सूचित करण्यात आले .





Social Plugin