डॉ.यशवंत पवार कन्नड :
अभय केंद्र खुलताबाद व सखी वन स्टॉप सेंटर कन्नड, महिला व बाल विकास विभाग यांच्या मार्फत जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक ७ मार्च २०२६ ते १४ मार्च २०२६ या कालावधीत विविध जनजागृतीपर साप्ताहिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील बचत गटातील महिला व ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधून महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजना तसेच महिलांच्या संरक्षणासंदर्भातील कायद्यांची माहिती देत जनजागृती करण्यात येत आहे. महिलांचे सक्षमीकरण व सामाजिक प्रश्नांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
याच अनुषंगाने तालुकास्तरीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी ‘बेटी बचाव बेटी पढाव’, ‘हुंडाबळी’, ‘नारीशक्ती’ आणि ‘बालविवाह टाळा’ असे सामाजिक जाणीव निर्माण करणारे विषय देण्यात आले आहेत.
सदर उपक्रम संरक्षण अधिकारी हर्षल पाटील व सखी वन स्टॉप केंद्र कन्नड येथील सर्व कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे राबविण्यात येत असून महिला व बाल विकास विभागाच्या योजना समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.





Social Plugin